महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढ मिळणार ? पे स्केल नुसार संभाव्य पगार वाढ जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर नव्या आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढू शकतो याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Maharashtra Government Employee : 2025 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायद्याचे ठरत आहे. कारण की या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीसोबतच आणखी एक मोठी भेट मिळाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे.

या नव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने आता आवश्यक कार्यवाई सुद्धा सुरू झाली आहे. प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो, यानुसार सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होईल आणि त्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी शक्य आहे.

दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाचा लाभ उशिराने मिळणार आहे पण याची अंमलबजावणी एक जानेवारी 2026 पासूनच होईल अशी शक्यता आहे.

दरम्यान केंद्रीय कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचारी यांच्या वेतनात सातव्या वेतन आयोगात फरक होता आणि आठव्या वेतन आयोगात देखील या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या वेतनात फरक राहणार आहे. सध्याच्या सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये इतके होते तर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 15 हजार रुपये इतके होते.

त्याचवेळी केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना एकच फिटमेंट फॅक्टर म्हणजे 2.57 हा फिटमेंट फॅक्टर लागू होता. दरम्यान आता नव्या आठव्या वेतन आयोगात देखील केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात फरक राहणार आहे. पण फिटमेंट फॅक्टर दोन्हीही कर्मचाऱ्यांना सारखेच राहतील.

अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार वाढ मिळणार? पे स्केल नुसार संभाव्य वेतन किती असेल ? याचा आढावा या लेखातून घेणार आहोत.

आठव्या वेतन आयोगात राज्य कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

सातव्या वेतन आयोगात 2.57 हा फिटमेंट फॅक्टर लागू होता. पण आठव्या वेतन आयोगात हा फिटमेंट 2.0 पट राहणार आहे. यानुसार लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 15000 वरून तीस हजार रुपये इतका होणार आहे. लेवल 2 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पंधरा हजार तीनशे वरून तीस हजार 600 इतका होणार आहे.

लेवल 3 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 16,600 वरून 33,200 होणार आहे. लेवल 4 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 17,100 वरून 34,200 होणार आहे. लेव्हल 5 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18000 वरून 36000 होणार आहे. लेव्हल 6 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 19,900 वरून 39,800 होणार आहे. लेव्हल 7 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 21,700 वरून 43,400 होणार आहे.

लेव्हल 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अनुक्रमे 51 हजार, 52 हजार 800, 58 हजार 400, 60 हजार 200, 64 हजार, 70 हजार 800, 77 हजार 200 आणि 83 हजार 600 रुपये इतका होईल. तथापि हा एक फक्त अंदाज आहे प्रत्यक्षात आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतरच राज्य कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे क्लियर होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!