Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार कापला जाणार आहे.
डिसेंबर महिन्याच्या पगारातून काही कर्मचाऱ्यांचा एक दिवसांचा पगार वजा करण्यात येणार असे संकेत मिळतं आहेत. खरे तर उद्या अर्थात 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.

मुख्याध्यापक महामंडळाच्या माध्यमातून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर उद्या पाच डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला जाणार आहे.
यासंदर्भात नुकतीच पुण्यात एक महत्त्वाची बैठक झाली होती या बैठकीत राज्यव्यापी संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे राज्यव्यापी आंदोलन सरकारी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित केलय.
यात राज्यातील सर्व स्तरांवरील कर्मचारी सहभागी होणार अशी माहिती समोर आली आहे. मात्र या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल असे विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने शाळा बंद आंदोलन रोखण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शाळा बंद ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश विभागाकडून देण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे हे आदेश जारी करताना आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. शिस्तभंगाच्या कारवाई अंतर्गत एका दिवसाच्या वेतन कपातीचा सुद्धा समावेश राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
यामुळे आता शिक्षण विभागाच्या या तंबीनंतर राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नेमका काय निर्णय घेणार, उद्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले जाणार का? ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी यासंदर्भात बोलताना राज्यातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे असे आवाहन केले.
तसेच, आंदोलनामुळे राज्यातील कोणतीही शाळा बंद ठेऊ नये. समजा जर शाळा बंद राहिली तर त्या संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असा इशारा यावेळी दिला आहे.













