महाराष्ट्रातील ‘या’ महापालिका कर्मचाऱ्यांची ड्युटीची वेळ बदलली ! नवीन वेळापत्रक आत्ताच जाणून घ्या

पुणे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत नुकताच एक मोठा बदल करण्यात आला असून आज आपण पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे सुधारित वेळापत्रक कसे आहे याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्यातील पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही पुणे महानगरपालिकेत अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी महानगरपालिकेत सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

कारण की, महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या माध्यमातून महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, आता आपण महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे नवीन वेळापत्रक कसे आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कसे आहे नवीन वेळापत्रक ?

खरे तर, महापालिकेचे अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ड्युटी आत्तापर्यंत सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:30 अशी होती. तसेच या संबंधित अधिकाऱ्यांची जेवणाची सुट्टी दुपारी दोन वाजेपासून ते अडीच वाजेपर्यंत होती.

मात्र आता अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ड्युटीची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी 5:45 अशी करण्यात आली आहे. तसेच जेवणाची वेळ एक ते अडीच वाजेपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच दुपारचा लंच ब्रेक जवळपास एक तासाने वाढवण्यात आला आहे.

यामुळे महापालिकेतील अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेवणासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. महत्वाची बाब अशी की अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जे वेळापत्रक लागू करण्यात आले आहे तेच वेळापत्रक सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि विभागीय निरीक्षक यांच्यासाठी सुद्धा लागू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

या कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकातही झाला बद्दल 

दुसरीकडे, महापालिका आस्थापनावरील कार्यालयीन प्रशासकीय कर्मचार्‍यांची ड्युटीची वेळ सुद्धा आता चेंज झाली आहे, या संबंधित कर्मचाऱ्यांची ड्युटीची वेळ आता सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी करण्यात आली आहे.

तसेच या कर्मचाऱ्यांना दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत लंच ब्रेक दिला जाणार आहे. शिवाय आस्थापनातील जे कार्यालयीन काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांची ड्युटीची वेळ मात्र सकाळी साडेनउ ते सायंकाळी साडेसहा अशी करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

यामुळे या बदललेल्या वेळापत्रकानुसार महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी वेळेत कामाच्या ठिकाणी हजर रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!