अहमदनगर, नासिक, पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार, गारपीट होणार ! मुंबई आणि उपनगरात कसं असेल हवामान?, पहा…..

Published on -

Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला आहे. आता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.

नासिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद या जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बहुतांशी भागात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस अति महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. हे चार दिवस राज्यातील बहुतांशी भागात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

एकीकडे राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यात काही भागात तापमानवाढ देखील होत आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात तापमानाने विक्रम मोडला आहे. तापमान तब्बल 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यामुळे राज्यात सध्या मिश्र हवामानाची अनुभूती होत आहे.

एकीकडे जोरदार पाऊस अन गारपीट तर दुसरीकडे तापमान वाढ आणि उकाडा असे मिश्र हवामान राज्यात पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात अहमदनगर, नाशिक, पुणे, जळगाव तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांशी भागात वादळी पाऊस झाला आहे.

आज अर्थातच 27 एप्रिल 2023 रोजी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मराठवाडा, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिक, अहमदनगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात वादळी पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे. यामुळे यासंबंधी जिल्ह्यांना आयएमडी च्या माध्यमातून ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला विशेष सतर्क राहण्याची गरज आहे.

याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अमरावती, वाशीम, अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याभागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने या संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. निश्चितच या देखील भागातील शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe