Maharashtra New National Highway : महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या जिल्ह्याला आणखी एका नव्या राष्ट्रीय महामार्गाची भेट मिळणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे गेल्या दीड – दोन दशकांच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्हे रस्ते मार्गाने एकमेकांच्या जवळ आले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नेटवर्क तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सुद्धा रस्त्यांचे नेटवर्क फारच मोठे झाले आहे.

दरम्यान आता राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागातील जळगाव जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात आणखी एक मोठी डेव्हलपमेंट घडली आहे. या जिल्ह्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गेल्या काही वर्षांच्या काळात मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळाला असून आता या जिल्ह्याला एक नवा राष्ट्रीय महामार्ग मिळणार आहे यामुळे जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात महत्त्वाचा अध्याय लिहला जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातील भुसावळ ते राजस्थान आतील चितोडगड दरम्यान नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार होणार आहे. भुसावळ–चित्तोडगड राष्ट्रीय महामार्ग 347 सी या नावाने ओळखला जाणार आहे.
दरम्यान, नवीन प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाल्याने खानदेश रत्न जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतीमाल देशातील कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी मध्य प्रदेश आणि राजस्थानात सहजरीत्या दाखल होणार आहे. हा नवीन प्रस्तावित महामार्ग फक्त कृषी क्षेत्रासाठीच नाही तर उद्योग शिक्षण पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी उपयोगी ठरणार आहे.
खरे तर जळगाव जिल्ह्याला आधीच पाच राष्ट्रीय महामार्गांची भेट मिळाली आहे आणि आता नवीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला असल्याने केळीसाठी प्रसिद्ध या जिल्ह्याला आता ‘हायवे हब’ म्हणून ओळखले जाणार आहे.
हा सहावा महामार्ग जळगाव जिल्ह्याच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा रोवणारा ठरणारा असा विश्वास व्यक्त केला जातोय. या नवीन महामार्गामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमधील दळणवळण अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
विशेषतः भुसावळ ते अजमेर या प्रवासात मोठी क्रांती घडणार असून, सध्याच्या तुलनेत अंतर तब्बल 150 किलोमीटरने कमी होणार आहे. परिणामी प्रवासाचा कालावधी 14 तासांवरून थेट 9 तासांपर्यंत कमी होईल. त्यामुळे प्रवासी तसेच मालवाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नव्या राष्ट्रीय महामार्गाचा रूट कसा असणार?
भुसावळ–पाल–खरगोन–धार–रतलाम–मंदसौर–नीमच–चित्तोडगड असा या महामार्गाचा प्राथमिक आराखडा असून, पुढे भीलवाडामार्गे पुष्कर आणि अजमेर शहरांशी हा मार्ग जोडला जाणार आहे.
महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातून सुमारे 36 किलोमीटर, तर मध्य प्रदेशात सुमारे 201 किलोमीटर अंतरातून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील अनेक तालुके आणि गावांना थेट राष्ट्रीय महामार्गाची जोड मिळणार आहे. सध्या भुसावळहून चित्तोडगडला जाण्यासाठी बऱ्हाणपूर–इंदूर किंवा चोपडा–शिरपूर असे दोन प्रमुख मार्ग वापरले जातात.
या मार्गांवरून 600 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करावे लागते. नवीन महामार्गामुळे हा ताण कमी होणार असून, वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होईल. या महामार्गाचा लाभ केवळ प्रवाशांपुरता मर्यादित न राहता शेतीमाल, औद्योगिक कच्चा माल आणि व्यापारी वस्तूंच्या वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बाजारपेठा अधिक जवळ येतील. सीमावर्ती ग्रामीण भागांचा विकास, रोजगारनिर्मिती, गोदामे, लॉजिस्टिक हब आणि उद्योगधंद्यांच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे. एकूणच भुसावळ–चित्तोडगड राष्ट्रीय महामार्ग जळगाव जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा नवा वेग ठरणार आहे.













