336 किमीचे अंतर 174 किमीवर येणार ! महाराष्ट्रातील ‘ह्या’ गावांमधून जाणार नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?

रेल्वे कडून महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यादरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात 17 नवीन रेल्वे स्थानक विकसित होणार आहेत. 

Published on -

Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रातील दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारा एक नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. खरे तर, भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशातील कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे विस्तारले गेले आहे. देशातील कोणत्याही भागात प्रवास करायचा असेल तरीही रेल्वेचे नेटवर्क उपलब्ध आहे.

शिवाय रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा आहे यामुळे अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. दरम्यान रेल्वेचे हे नेटवर्क आणखी वाढवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे कडून महाराष्ट्रात आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार केला जात आहे जो की मराठवाड्यातील जालना आणि खानदेशातील जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणार आहे.

हा प्रस्तावित रेल्वे मार्ग एकूण 174 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामुळे जळगाव ते जालना असा 336 किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रवास अवघ्या 174 किलोमीटर लांबीवर येणार आहे. दरम्यान आता आपण हा रेल्वे मार्ग प्रकल्प कसा असेल याचा आढावा घेऊयात.

कसा असणार नवा रेल्वे मार्ग ?

सध्या जळगाव ते जालना असा रेल्वे प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना मनमाड मार्गे जावे लागते. मनमाड मार्गे जळगाव ते जालना असा जर रेल्वे प्रवास करायचा झाला तर प्रवाशांना 336 किलोमीटर लांबीचा प्रवास करावा लागतो. पण जर जळगाव ते जालना असा थेट रेल्वे मार्ग विकसित झाला तर हे अंतर 174 किलोमीटरवर येणार आहे.

यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. या प्रकल्पासाठी 7,105 कोटी 43 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, आता या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण देखील पूर्ण करण्यात आले आहे.

हे जमिनीच्या सर्वेक्षण पहिल्यांदाच ड्रोन च्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे. तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील तीन गावांमध्ये जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे आणि एका गावात जमिनीची मोजणी सुरू झाली आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची मोजणी येत्या एका महिन्यात पूर्ण होईल अशी शक्यता आहे. मात्र भोकरदन तालुक्यातील जमिनीच्या मोजणीसाठी सप्टेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर याचे काम सुरु होणार आहे.  

या गावात तयार होणार नवीन रेल्वे स्थानक 

या रेल्वे मार्ग प्रकल्प अंतर्गत नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सायगांव, केदारखेड, राजूर, बवणेपंगरी, पिंपळगाव, नागेवाडी, दिनागाव या गावांमध्ये रेल्वे स्थानक विकसित होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!