Maharashtra News : महाराष्ट्रात सध्या मोठ्या महामार्गाचे कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केली जात आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडूनही विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. निश्चितचं या मोठमोठ्या रस्त्यांमुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.
मात्र राज्यात असेही अनेक ग्रामीण भागात रस्ते आहेत ज्यांची चाळण झाली असून यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. जळगाव जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती होती. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील एकूण नऊ रस्त्यांसाठी 70 कोटींची मंजुरी मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा हा तिसरा टप्पा संपूर्ण देशात राबवला जात आहे. त्याच्याच माध्यमातून जळगाव जिल्ह्यात 70 किलोमीटरचे रस्ते नव्याने तयार होणार आहेत. यामुळे निश्चितच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. आता 70 कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याने लवकरच या रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध 9 रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक निधी जळगाव मतदारसंघासाठी मिळाला असल्याचा दावा खासदार महोदय यांनी केला आहे. दरम्यान आज आपण जळगाव जिल्ह्यातील कोणत्या रस्त्यांची कामे या निधीतून केली जाणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
या रस्त्यांचे काम होणार
शिंदी-हिरापूर-अंधारी-तमगव्हाण १६ कि.मी.
पातोंडा वाघडू- रांजणगाव-कन्नड हायवे पर्यंत ११ कि.मी. मारवड-जैतपूर ६ कि.मी.
मुडी-बोदर्डे भरवस-चौबारी ९ कि.मी.
गिरड ते तळई तालुका हद्दीपर्यंत १ कि.मी. कासोदा ते गालापूर – ७ कि.मी.
शेवगे-पुनगाव, शेवगे बुद्रुक – कंकराज रत्नपिंप्री ६ कि.मी.
पासर्डी ते गोंडगाव घुसर्डी रोड ९ कि.मी.
ममुराबाद ते नांद्रा खुर्द ५ कि.मी.