राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘त्या’ वारसदारांना मिळणार आता दुप्पट निवृत्तीवेतन ; पहा डिटेल्स

Ajay Patil
Published:
Maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मंगळवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने काल महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.राज्य शासनाने या वारसदारांना दिल जाणार निवृत्ती वेतन दुप्पट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील त्या हुतात्म्यांच्या कार्याचा जागर या निमित्ताने केला गेला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या हुतात्म्यांच्या वारसांना दहा हजार रुपये प्रति महिना इतकं निवृत्ती वेतन दिलं जात होतं. मात्र आता या वारसदारांना दुप्पट म्हणजेच महिन्याला वीस हजार रुपये निवृत्ती वेतन दिल जाणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे माध्यमातून एक जीआर म्हणजेच शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 2014 सालापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना  मासिक दहा हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जात आहे. तसेच या हुतात्म्यांच्या वारसांना स्वातंत्र्य सैनिकांना जे लाभ मिळतात ते देखील अनुज्ञय करण्यात आले आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की हुतात्म्याच्या कुटुंबातील हयात आई-वडील किंवा विधवा पत्नी यापैकी एकाला हे निवृत्त वेतन मिळत असते.2014 पासून हे निवृत्तीवेतन दिल जात असून आता जवळपास आठ वर्ष झाले तेव्हा शासनाने यामध्ये वाढ केली आहे. निश्चितच उशिरा का होईना पण या निवृत्तीवेतनात वाढ झाली असल्याने सदर वारसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासन निर्णय जरी काल निघाला असला तरी देखील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एक नोव्हेंबर 2022 पासून होणार आहे. निवृत्तीवेतनाचा लाभ घेणाऱ्या या वारसदारांना फक्त निवृत्तीवेतन डबल झाले आहे प्रवास खर्च आणि इतर आर्थिक स्वलतीच्या बाबी जैसे थे राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe