महिलांना तिकीट दरात 50% सवलतीच्या योजनेबाबत मोठी बातमी ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार अंमलबजावणी?, पहा

Maharashtra News : राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आता 50 टक्के सवलतीच्या दरात एसटीचा प्रवास करता यावा यासाठी योजना शासनाने आखली आहे. या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 24 यामध्ये केली आहे. हा नवोदित सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प होता.

याच पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष बनवण्यासाठी तसेच पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात महिला, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी वेगवेगळ्या घटकांना केंद्रस्थानी ठेवून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्यात. यामध्ये महिलांसाठी एसटी बस तिकिटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला.

हे पण वाचा :- सावधान ! विजांच्या कडकडाटासह राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ एप्लीकेशनचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला

म्हणजेच आता राज्यातील महिलांना अर्ध्या तिकिटात राज्यभर प्रवास करता येणार आहे. यामुळे निश्चितच महिलांची आपल्या माहेरी ये जा वाढणार आहे. लेकीच्या आईकडे अधिक फेऱ्या आता पडणार आहेत. आई लेकीचा जिव्हाळा आणखीनच वाढेल पण ही योजना प्रत्यक्षात सुरू केव्हा होईल हाच मोठा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राज्यात भरात महिलांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.

परंतु महिलांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण की आज 17 मार्च 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आजपासून राज्यभरातील महिला आता अर्ध्या तिकिटावर प्रवास करू शकणार आहेत.

हे पण वाचा :- शेतकरी पुत्रांची फिनिक्स भरारी ! आपल्या कौशल्याच्या जोरावर मिळवलं 18 लाखांच पॅकेज

म्हणजे एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये आता राज्यातील महिलांना अर्ध तिकीट लागणार आहे. यामुळे महिलांना तर फायदा होईलच शिवाय एसटीचा अर्थचक्र देखील पुन्हा रुळावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यांमुळे एसटीला चांगला उत्पन्नाचा सोर्स उपलब्ध होणार आहे. ही योजना महिला सन्मान योजना म्हणून एसटी महामंडळाच्या स्तरावर ओळखली जाणार आहे.

दरम्यान आज पासून ही महिला सन्मान योजना कार्यान्वित झाली असून आता महिलांना केवळ अर्ध्या तिकिटात एसटीच्या बसने प्रवास करता येणार आहे. निश्चितच, महीलांसाठी ही एक आनंदाची बातमी असून शासनाच्या या निर्णयाचा अर्ध्या लोकसंख्येकडून स्वागत होत आहे. 

हे पण वाचा :- देशातील पहिली निओ मेट्रो महाराष्ट्रात !निओ मेट्रो प्रकल्पाबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिल्यात ‘या’ सूचना, पहा काय म्हटलं पीएमओने…..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe