Maharashtra News : कोरोनामुळे शासकीय नोकर भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना दोन वर्ष कोणत्याच सरळ सेवा भरती देता आली नाही. यामुळे, नोकरभरतीसाठी तयारी करणाऱ्या अनेकांनी आपली वयोमर्यादा देखील ओलांडली. परिणामी शासकीय नोकर भरतीसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवून दिली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात होती. शासनाने देखील नुकतीच याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली होती.
अशातच आता शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेत शासकीय नोकर भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून दिली आहे. शुक्रवारी या संदर्भात शासनाकडून शासन निर्णय देखील जारी झाला आहे. म्हणजेच आता सरकारी नोकर भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून देण्यात आली आहे.
शुक्रवारी जारी झालेल्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून तीन मार्च 2023 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान शासकीय सेवेत नियुक्ती संदर्भात निघणाऱ्या जाहिरातीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही शिथिलता राहणार आहे. सद्यस्थितीला मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादा 43 आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे वयोमर्यादा आहे. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे वयोमर्यादा होणार आहे तर मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे वयोमर्यादा होणार आहे.
निश्चितच यामुळे शासकीय नोकर भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा फायदा होणार आहे. मात्र ही वयोमर्यादा तात्पुरती वाढवण्यात आली आहे. म्हणजेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत निघणाऱ्या नोकरभरतीसाठीच ही वयोमर्यादा लागू राहणार आहे. त्यापुढे निघणाऱ्या कोणत्याच शासकीय नोकर भरतीसाठी ही वयोमर्यादा लागू राहणार नाही. विशेष म्हणजे हा निर्णय जारी होण्यापूर्वी निघालेल्या ज्या शासकीय नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची मुदत अजून शेष असेल अशा भरतीसाठी देखील हा निर्णय लागू राहणार आहे.
निश्चितच इसके नोकर भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांची मागणी पाहता शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र हा एक तात्पुरता निर्णय आहे. यामुळे याचा लाभ केवळ कोरोनामुळे ज्या उमेदवाराची वयोमर्यादा ओलांडली गेली असेल अशांनाच मिळू शकणार आहे. मात्र या निर्णयाचे चांगले परिणाम होतील असे देखील काही जाणकार सांगत आहेत.