Maharashtra News : महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. खरं पाहतां हे संबंधित कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार शासनाकडे निवेदन देत आहेत.
अनेकदा निवेदन, आंदोलन, बैठक होऊनही प्रलंबित मागण्या जैसे थे असल्याने, प्रलंबित मागण्या सोडवल्या जात नसल्याने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आता बेमुदत संपावर जाण्याची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे या बेमुदत संपात परीक्षांवर देखील बहिष्कार टाकला जाणारा असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की, 2 फेब्रुवारीपासून हे बेमुदत संप सुरू होणार आहे. एकंदरीत संबंधित कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावरचं असल्याने आता या संपाचे आयोजन सदर कर्मचाऱ्यांनी केले असून संबंधित विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या परीक्षांवर देखील बहिष्कार टाकला जाणार आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने अनेकदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहेत. या प्रलंबित मागण्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सातव्या आयोगाप्रमाणे वेतन, आश्वासित प्रगती योजनायासह विविध मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान आता 2 फेब्रुवारीपासून या संबंधित कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून याचा निवेदन औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिवांना देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष कैलास पाथ्रीकर यांनी दिली आहे.
या निवेदनात कर्मचाऱ्यांनी वारंवार आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला असूनही प्रलंबित मागण्या सुटल्या नसल्याचे सांगितले गेले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त समितीने 6 जानेवारीला बैठकीचं आयोजन केलं होतं.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 फेब्रुवारीपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून या आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे. निश्चितच आता या संबंधित कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याची तयारी दाखवली असल्याने यावर काय तोडगा काढला जातो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.