Maharashtra News : महाराष्ट्र राज्य सरकार महसूल वाढीसाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेत असते. राज्याच्या तिजोरीत अधिकाधिक महसूल कसा जमा होईल, राज्याच्या विकासासाठी पैसा कसा जमा होईल यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असतात.
दरम्यान याच महसूल वाढीच्या अनुषंगाने राज्य सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय, हा निर्णय दारुवरील टॅक्स बाबत आहे. दारूवर आकारला जाणारा व्हॅट दुप्पट करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे आणि यामुळे उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार या निर्णयामुळे अधिक वाढला असून सदरील निर्णयाविरोधात आता हॉटेल आणि बार उद्योगातील लोकांमध्ये कमालीची असंतोषाची लाट पाहायाला मिळत आहे.
याशिवाय परवाना शुल्क देखील 15 टक्क्यांनी वाढलेले आहे दुसरीकडे उत्पादन शुल्कात 60 टक्क्यांची वाढ झालेली आहे आणि यामुळे हॉटेल आणि बार उद्योग पूर्णपणे बेजार झाला असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निर्णयाच्या विरोधात आता इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन कडून राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.
या दिवशी परमिट रूम आणि बार बंद राहणार
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन म्हणजेच AHAR ने टॅक्स मध्ये लागू करण्यात आलेली ही वाढ अवाजवी असून व्यवसायासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे.
या निर्णयामुळे लहान आणि मध्यम दर्जाचे हॉटेल्स आणि बार अस्तित्वातच राहणार नाहीत असाही आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, याच करवाढ संदर्भात संघटनेकडून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
मात्र सरकारकडून प्रतिसाद मिळत नाहीये. म्हणूनच आता या संघटनेने राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनकडून येत्या दोन दिवसांनी म्हणजेच 14 जुलै 2025 रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे.
अर्थातच या दिवशी महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत. 14 जुलै चा बंद संपूर्ण महाराष्ट्रात असेल आणि या बंद दरम्यान राज्यातील सर्व दारू देणारे सर्व परमिट रूम, बार आणि हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहणार आहेत.
जर या बंद नंतर देखील सरकारकडून जर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा देखील संघटनेकडून दिला जात आहे.
यामुळे आता या संदर्भात फडणवीस सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दारूवर आकारला जाणारा व्हॅट असोशियन कडून घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कमी केला जाईल का ? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.