Maharashtra Picnic Spot : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय. आणि यामुळे अनेक जण पिकनिक चा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.
कारण की आज आपण महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला या पावसाळ्यात फिरायला जायचे असेल तर तुम्ही लोणावळ्याची निवड करू शकता.

लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या ठिकाणी देशभरातील पर्यटक पिकनिकला येतात. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
संभाजीनगर पासून फक्त सहा तासांच्या अंतरावर
लोणावळा बाबत बोलायचं झालं तर हे पर्यटन स्थळ छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या सहा तासांच्या अंतरावर आहे. या पर्यटन स्थळाला महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.
कारण येथे तुम्हाला पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मुंबई पुण्यातील असंख्य पर्यटक येथे वीकेंडला गर्दी करतात. याशिवाय राज्यातील, नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातील पर्यटक या ठिकाणी पिकनिकला येतात.
लोणावळा हे ठिकाण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या शहरापासून अवघ्या साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावर वसलेले एक सुंदर असे हिल स्टेशन आहे. या सुंदर हिल स्टेशनला गेलात तर येथे तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
टायगर पॉईंट, भुशी डॅम भाजे लेणी, एकवीरा देवी गड ही ठिकाणी लोणावळ्यातील आकर्षणाचे केंद्र आहेत. लोणावळा येथील सुंदर हिरवा गार निसर्ग आणि शांत वातावरण तुम्हाला नक्कीच भावणार आहे.
लोणावळ्यातील टायगर पॉईंट हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडीचे ठिकाण आहे आणि या ठिकाणी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी आपल्याला दिसते. टायगर पॉईंटला मोठ्या प्रमाणात धुके असते आणि इथे इतर ठिकाणांपेक्षा अधिक थंड वातावरण दिसते.
या ठिकाणी पावसाळ्यामध्ये भेट देण्याची मजा काही औरच असते. कारण की, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथे प्रचंड धुके असते, दाट धुक्यामुळे येथे समोरचा व्यक्ती सुद्धा ओळखता येणे अशक्य बनते.
हे थंड हवेचे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले पृथ्वीवरचा जिवंत स्वर्ग आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 630 किलोमीटर उंचीवर स्थिरावलेले आहे. लोणावळा ते खंडाळा या दरम्यान जर लॉंग ड्राईव्हला गेला तर तुमच्या पिकनिकची मजा 100% दुप्पट होणार आहे.
तुम्हाला जर लोणावळ्याला जायचे असेल तर तुम्ही मुंबई किंवा पुण्यातून येथे येऊ शकता. बाय रोड बस रेल्वे अशा वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेचा वापर करून तुम्ही येथे पोहोचू शकता.
जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथे राहत असाल आणि तुम्हाला लोणावळ्याला यायचे असेल तर तुम्ही मुंबई किंवा पुण्याच्या बस मध्ये बसून तिथून येऊ शकता. रेल्वेने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर छत्रपती संभाजीनगर येथून थेट पुण्याची रेल्वे पकडा आणि पुण्यातून तुम्ही लोणावळ्याला येऊ शकता.