अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 12 रेल्वे स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

रेल्वे कडून आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. रेल्वेने आषाढी एकादशीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर करिता विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास करणार आहे. खरे तर पुढल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांचा मेळा सजणार आहे.

आषाढी एकादशीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी येतात. याही वर्षी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे गर्दी करणार आहेत आणि याच भाविकांच्या गर्दीच्या अनुषंगाने रेल्वे कडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुजरात येथील भाविकांसाठी तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमधील वारकऱ्यांसाठी रेल्वे कडून उधना ते पंढरपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब अशी की ही गाडी अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर आणि कोपरगाव या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. दरम्यान आज आपण उधना ते पंढरपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या याच आषाढी एकादशी स्पेशल ट्रेनच्या संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

विशेष गाडीचे वेळापत्रक कसे असणार 

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रेल्वे क्रमांक 09079 अर्थातच उधना – पंढरपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन चार जुलै 2025 रोजी उधना रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक 09080 म्हणजेच पंढरपूर उधना विशेष एक्सप्रेस ट्रेन पाच जुलै रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

यासोबतच गाडी क्रमांक 09081 म्हणजेच उधना – पंढरपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन पाच जुलै 2025 रोजी उधनातून सोडली जाणार आहे आणि गाडी क्रमांक 09082 म्हणजेच पंढरपूर-उधना विशेष एक्सप्रेस ट्रेन 6 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून रवाना केली जाणार आहे.

कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष ट्रेन 

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, उधना ते पंढरपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

ही गाडी अहिल्यानगर जिल्ह्यातही थांबणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि अहिल्यानगर या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.

बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी या महत्त्वाच्या स्टेशनवर ही गाडी थांबा घेणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!