मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! नांदेड, छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस असणार वेळापत्रक?

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की, दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने एका विशेष गाडीचे नियोजन केले आहे.

ही गाडी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खास ठरणार आहे. या गाडीचा मनमाड व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील फायदा होणार आहे. खरे तर दरवर्षी राजधानी मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आंबेडकरी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय एकवटतो. यंदाही लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत आणि याच अनुयायींच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आदिलाबाद ते दादर यादरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही विशेष गाडी मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानकावरून धावणार असून यामुळे मराठवाड्यातील आंबेडकरी अनुयायींना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आदिलाबाद ते दादर अशी विशेष गाडी चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ही महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चालवण्यात येणारी स्पेशल गाडी नांदेड , छत्रपती संभाजी नगर मार्गे धावणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार याची माहिती जाणून घेऊयात. 

कसे राहणार विशेष गाडीचे वेळापत्रक ? 

उद्या पाच डिसेंबर 2025 रोजी आदीलाबाद – दादर विशेष गाडी आदीलाबाद रेल्वे स्थानकावरून सकाळी सात वाजता सोडली जाणार आहे. त्यानंतर ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावर सकाळी दहा वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.

पुढे ही गाडी पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड व कल्याणमार्गे शनिवारी पहाटे साडेतीन वाजता दादर रेल्वे स्थानकावर येणार आहे.

तसेच, परतीच्या प्रवासात 7 डिसेंबर 2025 रोजी दादर येथून मध्ये रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि वर सांगितलेल्या मार्गाने ही गाडी सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी आदिलाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी दोन वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार अशी माहिती नांदेड विभागाकडून मिळाली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News