Maharashtra Rain Alert By IMD : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने राज्यात थैमान माजवलं होतं. दरम्यान आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ होत असून उन्हाचे चटके बसत आहेत. अशातच पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती तयार होत असल्याने पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे मत भारतीय हवामान विभागाने व्यक्त केले आहे. निश्चितच मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक यामुळे वाया गेले आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो 1 ‘या’ दिवशी धावणार; असे राहतील तिकीट दर
आता थोड्याफार प्रमाणात जे काही रब्बी हंगामातील पीक बचावले आहे ते पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून काढणी योग्य पिकांची काढणी सध्या सुरू आहे. तसेच फळबाग पिकांचे व्यवस्थापनाचे काम शेतकऱ्यांकडून केले जात आहे. अशातच राज्यात पुन्हा एकदा वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढच्या 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अन्य भागात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडणार आहे. एवढेच नाही तर उद्या राज्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात उद्या गारपीटीची शक्यता राहणार आहे.
हे पण वाचा :- Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या नियमात झाला मोठा बदल ! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा चटका कायम राहणार आहे. निश्चितच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीटीची शक्यता लक्षात घेता तसेच राज्यातील इतर विभागात पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. गारपीट होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
काढणी झालेला माल शेडमध्ये किंवा गोडाऊन मध्ये सुरक्षित ठेवावा. ज्या शेतीपिकांची सोंगणी झालेली नसेल मात्र काढणी पूर्ण झालेली असेल अशा पिकांना झाकून ठेवावे. तसेच पावसाच वातावरण तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी. झाडाखाली उभे राहू नये असे आवाहन यावेळी केले जात आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील केशरी रेशनकार्डधारक लोकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार ! पण असा करावा लागणार अर्ज, नाहीतर…..