Maharashtra Rain Alert : येत्या सव्वा ते दीड महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. शेतकरी बांधव सध्या शेत जमिनीची पूर्वमशागत करण्यात व्यस्त आहेत.
तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी, मळणी अन स्टोरेज तसेच शेतीमाल विक्री व्यवस्थापनाची कामे केली जात आहेत. सध्या कांदा, हळद या पिकाची काढणी सूरु आहे. मात्र या अशा महत्त्वाच्या वेळी अवकाळी पावसाने राज्यात अक्षरशः थैमान माजवला आहे. जवळपास 15 ते 20 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ बहुचर्चित उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला, आता ‘या’ महिन्यानंतर सुरु होणार, पहा….
भाग बदलत पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी मात्र चिंतेचा विषय बनत चालला आहे. तसेच काही भागात गारपीट देखील झाली असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान भारतीय 24 एप्रिल पासून अर्थातच कालपासून ते 28 एप्रिल पर्यंत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या मते विदर्भात या कालावधीमध्ये पावसाची अधिक शक्यता राहणार आहे तर इतर भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन आठ ई-शिवाई बस एसटीच्या ताफ्यात दाखल; ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार सेवा
या नवीन हवामान अंदाजानुसार आज आणि उद्या विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 एप्रिल 2023 म्हणजे आजपासून विदर्भातील भंडारा चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमध्ये 26 एप्रिल 2023 पर्यंत गारपिटीची शक्यता आहे.
हे दोन दिवस दुपार नंतर गारपिट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 26 एप्रिल नंतर त्यापुढील दोन दिवस विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहणार आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.
हे पण वाचा :- ‘हा’ शेअर ठरला कुबेरचा खजाना ! फक्त 8 वर्षात 1 लाखाचे झालेत 3 कोटी 70 लाख, पहा कोणता आहे तो बाहुबली स्टॉक?













