सावधान ! आज ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Ajay Patil
Published:

Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवल आहे. यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबाग वर्गीय पिकांना देखील मोठा फटका बसत आहे. काल मध्यरात्री राजधानी मुंबईत देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला यामुळे मानवी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.

वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. मुंबईसह राज्यातील इतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान वाचवला आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ म्हणजे जवळपास सर्वत्र पाऊस पडत आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान शेती व्यवसायाचे होत आहे. शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात देखील अवकाळी पावसामुळे मोठा नुकसान सहन करावं लागलं होतं.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा अंदाज पुन्हा ठरला खरा ! आता पुढचा अंदाज नेमका काय? केव्हा थांबणार पावसाचं थैमान, पहा पंजाब डख काय म्हणताय…..

गेल्या महिन्याच्या अवकाळीमधून ज्या शेतकऱ्यांची पिके वाचली होती ती देखील चालू महिन्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळे पूर्णतः वाया गेली आहेत. यामुळे आधीच बेजार झालेल्या बळीराजाला मोठा फटका बसला असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान आगामी काही दिवस राज्यात असंच हवामान राहणार असून अवकाळी पाऊस कायम राहणार आहे.

आज देखील महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 13 एप्रिल 2023 वार गुरुवार रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! एनपीसीआईएलमध्ये ‘या’ 325 रिक्त जागांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

एवढेच नाही तर काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता देखील आयएमडीच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. 13 ते 15 एप्रिल दरम्यान काही जिल्ह्यात गारपीटीची देखील शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट होणार असून विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्यात आगामी काही दिवस पावसाचेच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक सजग आणि सतर्क राहायचे आहे. गारपिटीची शक्यता लक्षात घेता आपल्या पशुधनाची देखील काळजी घेण्याचे आवाहन यावेळी जाणकार लोकांच्या माध्यमातून केले जात आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट; शासन निर्णय निर्गमित, पहा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe