Maharashtra : अहमदनगर जिल्ह्यातून मकर संक्रांतीच्या पर्वावर एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, महाराष्ट्रात ज्या पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित शाळा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार बनवण्यासाठी संबंधित गावातील महिला स्वयंपाकी कर्मचारी नियुक्त केलेले असतात.
या मदतनीस महिला कर्मचाऱ्यांना मात्र खूपच कमी मानधन दिलं जातं. अवघ 1500 रुपये प्रति महिना मानधन घेऊन या महिला कर्मचारी राब-राब राबत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील 4,550 अनुदानित शाळांमध्ये देखील सुमारे सात हजार 785 महिला कर्मचारी स्वयंपाकी अन मदतणीस म्हणून कार्यरत आहेत.
अतिशय अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या या अहमदनगर जिल्ह्यातील महिला स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना मात्र गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळाले नव्हते. आपल्या हाताने विद्यार्थ्यांचे पोषण पूर्ण करणाऱ्या हातालाच यामुळे उपासमारीची वेळ आली होती. निश्चितचं दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे या स्वयंपाकी मदतनीस कर्मचाऱ्यांचे स्वयंपाकाचे बजेट कोलमडले होते.
दरम्यान आता या मकर संक्रांतीच्या पर्वावर अहमदनगर जिल्ह्यातील शाळेत पोषण आहार बनवणाऱ्या या स्वयंपाकी मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांचे जे दोन महिन्याचे रखडलेले वेतन होते ते शासनाकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग झाले असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. या 7,787 स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन मिळाले आहे. एकूण 2 कोटी 66 लाख रुपये संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
खरं पाहता या कामगारांचे वेतन रखडल्याची घटना पहिल्यांदाच घडत आहे असं नाही तर या आधी देखील या मदतनीस कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले होते. या गरजू कर्मचाऱ्यांना महिन्याला जे वेतन दिलं पाहिजे ते दोन ते तीन महिन्यात यथावकाश, शासन आपल्या सवडीने त्यांच्या खात्यात जमा करत असल्याचा आरोप केला जात आहे. आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वेतन या कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले आहे. त्यामुळे मकर संक्रांति निमित्ताने मोठा दिलासा त्यांना मिळाला असून त्यांच्या घामाचा दाम उशिराने का होईना पण भेटला आहे.
खरं पाहता या कर्मचाऱ्यांना जे मानधन दिलं जातं त्या मानधनात केंद्राचे सहाशे रुपये आणि राज्याचे 900 रुपये जोडलेले असतात. या सदर मदतनीस आणि स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचे काम हे खूप कष्टाचे असल्याने त्यांना दिल्या जाणाऱ्या तुटपुंजी मानधनमध्ये वाढ केली गेली पाहिजे अशी मागणी शासनाकडे होत आहे मात्र शासन यावर गांभीर्याने दखल घेत नसल्याचे चित्र आहे. खरं पाहता या महागाईच्या काळात एक हजार पाचशे रुपये मानधनातं या कर्मचाऱ्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे अशी मागणी सध्या जोर धरत आहे.