भारतातील सर्वाधिक श्रीमंत आमदार महाराष्ट्रात ! अंबानी, अदानीला देतो टक्कर; राज्यातील ‘या’ आमदाराकडे 33830000000 रुपयांची संपत्ती

सध्या राजधानी मुंबईत पावसाळी अधिवेशन संपन्न होत आहे आणि यामुळे राज्यातील सर्वच आमदार आणि मंत्री मुंबईत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील आमदारांची आणि मंत्र्यांची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Published on -

Maharashtra Richest MLA : सध्या महाराष्ट्रातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामुळे सगळ्यांना राज्यातील आमदारांचे, मंत्र्यांचे हक्क, अधिकार, पगार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. अशातच आता महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत आमदाराची माहिती समोर आली आहे.

सदर आमदाराची श्रीमंती एवढी अधिक आहे की तो फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वाधिक श्रीमंत आमदार बनलाय. महत्त्वाची बाब अशी की गेल्या पाच वर्षात या आमदाराची श्रीमंती तब्बल 575 टक्क्यांनी वाढली आहे.

हा राज्याचा सर्वाधिक श्रीमंत आमदार, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्यापेक्षा 27 पटींनी अधिक श्रीमंत आहे. या आमदाराकडे असणारी संपत्ती पाहता हा आमदार अंबानी आणि अदानी सारख्या उद्योगपतींना टक्कर देतो असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.

नक्कीच आता तुम्हाला या आमदाराची माहिती जाणून घ्यायची असेल, चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार नेमका आहे तरी कोण?

हे आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत आमदार 

राजधानी मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदार संघाचे आमदार पराग शहा हे सध्या स्थितीला महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जात आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

पराग शहा यांची एकूण संपत्ती 3353.06 कोटी इतकी आहे. खरे तर पराग शहा यांनी 2019 च्या निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यामध्ये त्यांची संपत्ती फक्त 550 कोटी रुपये एवढी होती.

मात्र 2024 च्या निवडणुकीत सादर केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून अशी माहिती समोर आली आहे की त्यांची संपत्ती आता 3353.06 कोटी रुपये एवढी आहे. म्हणजेच 2019 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत तब्बल 575 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे 124 कोटी रुपयांचे संपत्ती आहे आणि त्यांच्यावर जवळपास 22 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यानुसार विचार केला असता पराग शहा हे आमदार अजितदादांपेक्षा 27 पटींनी श्रीमंत आहेत.

यामुळे पराग शहा यांची सातत्याने चर्चा होत असते. गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील ते चर्चेत आले होते आणि आता पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच त्यांच्या संपत्तीची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे.

पराग शहा आहेत मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती 

2024 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार आमदार पराग शाह यांच्याकडे 3,315 कोटींची जंगम आणि 67 कोटींची अचल संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार शहा यांच्या स्वतःच्या नावावर 2,179 कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 1,136  कोटींची संपत्ती आहे.

पराग शाह हे रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवसाय करतात. ते स्वतः बिल्डर आहेत आणि मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही बांधकाम कंपनी चालवत आहेत. यासोबतच ते एमआयसीआय ग्रुपचे अध्यक्ष सुद्धा आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!