Maharashtra School Student Uniform : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या गणवेशासंदर्भातील आहे. वास्तविक महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश मिळतो.
हा गणवेश मात्र राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जातो. परंतु आता यामध्ये मोठा बदल होणार आहे. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील मोफत गणवेश शासनाकडून पुरवला जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

विशेष म्हणजे याची अंमलबजावणी येत्या वर्षापासूनच सुरू होणार आहे. तसेच गणवेश वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये देखील मोठा बदल होणार आहे. याबाबत राज्यातील शिक्षण विभागाने एक मोठ अपडेट दिल आहे.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 2 महत्वाचे जीआर जारी, आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना…..
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मिळणार सारखाच गणवेश
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यासाठी पैशांचे वितरण केले जाते आणि शाळा व्यवस्थापन समित्या, संस्था यांच्या स्तरावर कापड खरेदी करून विद्यार्थ्यांना गणवेश पुरवले जातात.
मात्र आता ही पद्धत कालबाह्य होण्याची शक्यता आहे. कारण की आता येत्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये सारखाच गणवेश विद्यार्थ्यांना राहणार आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून कापड उपलब्ध करून दिले जाणार असून याची शिलाई मात्र बचत गट किंवा स्थानिक पातळीवर केली जाणार आहे.
याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली असून या येत्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते असं देखील या अधिकाऱ्यांनी नमूद केल आहे.
हे पण वाचा :- पंजाब डख नवीन अंदाज; आजपासून ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, काही भागात गारपीट देखील होणार, पहा काय म्हणताय डख
वास्तविक गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यस्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदीचा प्रयोग अमलात आणला गेला होता. परंतु यामध्ये तांत्रिक गोंधळ निर्माण झाला.
म्हणून मग हा निर्णय पुन्हा एकदा बदलण्यात आला आणि गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले. आता मात्र राज्यस्तरावरूनच गणवेशाचे कापड खरेदी केले जाणार आहेत.
यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळांचा गणवेश आता एक समान राहणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. पण यंदा 15 जून पासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणार का? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; अभ्यास समिती जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीच्या वयाबाबत शासनाला देणार ‘हा’ अहवाल?