विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी ; 8 आणि 9 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्वच शाळा बंद राहणार ! शाळा बंद असण्याचे कारण पहा…..

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मंगळवारी आणि बुधवारी सुट्टी राहणार आहे. या दिवशी कोणताही सण नाही तरीही शाळांना सुट्टी राहणार आहे. म्हणूनच आज आपण हे दोन दिवस राज्यातील शाळा बंद का राहणार ? याचे कारण जाणून घेणार आहोत. 

Published on -

Maharashtra Schools : शालेय विद्यार्थ्यांना आज रविवार तसेच आषाढी एकादशी निमित्ताने सुट्टी आहे आणि आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. उद्याचा दिवस विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे आणि त्यानंतर आठ आणि नऊ तारखेला शाळेला सुट्टी राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी राज्यातील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी मिळणार आहे.

हे दोन दिवस राज्यातील शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे आणि या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा सुद्धा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आता आपण राज्यातील शालेय शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद आंदोलन का पुकारले आहे, यामागील नेमके कारण काय याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

शाळा बंद आंदोलन पुकारण्याचे कारण ?

मंगळवारी आणि बुधवारी पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे कारण की या आंदोलनाला विविध संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. या आंदोलनाच्या स्वरूपाबाबत बोलायचं झालं तर हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे होणार आहे.

मुंबईतील आझाद मैदान येथे आठ आणि नऊ तारखेला राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकवटणार आहेत आणि आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात या अनुषंगाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

खरे तर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना एक जून 2024 पासून वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. खरेतर या मागणीसाठी गेल्या वर्षी सुद्धा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली होती.

एक ऑगस्ट 2024 पासून सलग 75 दिवस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या आंदोलनाचा धसका घेत तत्कालीन सरकारने 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणी मान्य करण्याचे जाहीर केले होते.

मात्र, 14 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेल्या शासन निर्णयात विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. परिणामी आता याच टाळाटाळीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरात शाळा बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाने दिला आहे.

महत्त्वाची बाब अशी की या अनुषंगाने संबंधित संघटने कडून एक जुलै 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्रीमान अजितदादा पवार तथा उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. या संघटनेने शिक्षणमंत्र्यांना देखील निवेदन दिलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!