महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर ! बीएड झालेल्या शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट

बीएड झालेल्या आणि सध्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी एक नवीन कोर्स तयार करण्यात आला आहे. हा ब्रिज कोर्स नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन यांच्याकडून डेव्हलप करण्यात आलेला आहे. हा कोर्स ऑगस्ट 2023 च्या आधी शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्यांसाठी राहणार आहे.

Published on -

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील तर किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळेत शिकवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनकडून काही नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. या अन्वये शिक्षकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. दरम्यान आता आपण नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून नेमके काय नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत याच संदर्भातील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहेत डिटेल्स?

मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट 2023 पूर्वी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये बीएड पदवीवर नियुक्त झालेल्या शिक्षकांना आता एक नवीन कोर्स करावा लागणार आहे. या शिक्षकांना आता सहा महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

प्रशिक्षण म्हणून संबंधित शिक्षकांना सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून हा नवा कोर्स तयार करण्यात आला आहे.

जो की ऑगस्ट 2023 पूर्वी नियुक्त झालेल्या बीएड उत्तीर्ण शिक्षकांसाठी अनिवार्य राहणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या संस्थेकडून तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था द्वारे आयोजित केला जाईल.

नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनचे सदस्य सचिव अभिलाषा झा यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्र काढले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की ज्या शिक्षकांनी बी.एड केले आहे आणि 11 ऑगस्ट 2023 च्या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला आहे अशा शिक्षकांसाठी हा अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आला आहे.

खरेतर, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा आदेश जारी केला होता. सात ऑगस्ट 2024 रोजी हा आदेश काढण्यात आला होता. दरम्यान, जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचा परिणाम उत्तर प्रदेशातील 35 हजार शिक्षकांवरही होईल ज्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते.

मात्र, ज्या लोकांनी फक्त अर्ज केला होता आणि ज्यांची निवड झाली नव्हती त्यांच्यासाठी हा कोर्स राहणार नाही. म्हणजेच त्यांना याचा लाभ मिळणार नाही. दुसरीकडे, एनसीईआरटीने जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांना जोडण्यासाठी आणखी एक ब्रिज कोर्स सुद्धा विकसित केला असल्याची माहिती हाती आली आहे.

विशेष बाब अशी की याबाबतची माहिती सीबीएसईने शाळांना पाठवली सुद्धा आहे. दरम्यान हा ब्रिज कोर्स पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी डेव्हलप करण्यात आला आहे. यातील इयत्ता आठवीच्या वर्गासाठी हा कोर्स दीड महिन्यांचा म्हणजेच 45 दिवसांचा राहणार आहे आणि पाचवीच्या वर्गासाठी फक्त एक महिन्याचा म्हणजेच 30 दिवसांचा राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News