महाराष्ट्रातील ‘ह्या’ शाळेची जगातील टॉप 10 शाळांमध्ये निवड ! महाराष्ट्राच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हरियाणा या चार राज्यांमधील चार शाळांनी जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका स्पर्धेत जगभरातील शाळांमध्ये भारतातील चार शाळा पहिल्या 10 मध्ये आपले स्थान पक्के करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या आहेत. राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून 2025 पासून सुरू झाल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातील एका शाळेची जगातील टॉप 10 शाळांमध्ये निवड करण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कार 2025 स्पर्धेत महाराष्ट्रातील एका शाळेने टॉप 10 मध्ये स्थान मिळवलेले आहे.

महाराष्ट्र व्यतिरिक्त यामध्ये भारतातील हरियाणा कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यातील शाळांनी देखील आपले स्थान पक्के केले आहे. म्हणजेच या पुरस्कारात देशातील चार शाळांनी आघाडीची झेप घेतली आहे.

महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील शाळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत या पुरस्कारात पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळवले आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धेतील अंतिम विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील या शाळेचा टॉप 10 मध्ये समावेश

राज्यातील पुण्याजवळील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने या स्पर्धेच्या पहिल्या 10 मध्ये स्थान पक्के केले आहे. ‘विषयमित्र’ या अभिनव संकल्पनेतून समवयस्क शिक्षणाचा नमुना राबवून सार्वजनिक शिक्षणात या जिल्हा परिषदेच्या शाळेने क्रांती घडवली आहे.

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या या पद्धतीने गुणवत्ता आणि आत्मविश्वास वाढवण्यात यश मिळाले आहे आणि म्हणूनच या शाळेची या स्पर्धेच्या ‘सामुदायिक सहकार्य’ या श्रेणीसाठी निवड झाली आहे.

देशातील इतर तीन शाळा कोणत्या 

या स्पर्धेत हरियाणा कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील शाळांनी सुद्धा पहिल्या दहा मध्ये स्थान पक्के केले आहे. हरियाणातील फरीदाबादमधील एनआयटी-5 येथील कन्या शासकीय माध्यमिक शाळेने पोषण, आरोग्य व शिक्षण यांचा समन्वय साधत मुलींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत.

त्यामुळे तिला ‘निरोगी जीवनाला प्रोत्साहन’ या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. याव्यतिरिक्त कर्नाटक राज्यातील बेंगळुरूच्या एक्या स्कूलने प्राथमिक शिक्षणातील नवोन्मेषात्मक पद्धतींसाठी आपले स्थान पक्के केले आहे. शिवाय उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसीतील दिल्ली पब्लिक स्कूलने पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावरील आपले स्थान पक्के केले आहे. 

ब्रिटनमधील या स्पर्धेचा उद्देश काय आहे 

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटन येथील टीफोर एज्युकेशन या संस्थेने करोना कालखंडानंतर शाळांच्या कार्याचा जागतिक आढावा घेऊन हे पुरस्कार सुरू केले आहेत. केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता समाज परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शाळांना जगापुढे आणणे हे या स्पर्धेचे आणि पुरस्काराचे उद्दिष्टे असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान या स्पर्धेत पहिल्या दहा मध्ये भारतातील चार शाळांचा समावेश आहे. दरम्यान देशातील या शाळांचा सहभाग शिक्षणव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवत असल्याचा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होतोय. तथापि आता ऑक्टोबर महिन्यात जे अंतिम निकाल जाहीर होतील त्यामध्ये भारतातील कोणकोणत्या शाळांची नावे पाहायला मिळतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!