आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ ; 1 जानेवारीपासून मिळणार लाभ, शासन निर्णय पण झाला जारी

Maharashtra State Employee News : शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय झाला असून यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

खरं पाहता, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने शिक्षण सेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय गुलदस्त्यातच होता.

याबाबत शासन निर्णय जारी झालेला नव्हता. यामुळे शासन निर्णय केव्हा जारी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान आता राज्य शासनाने शिक्षण सेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात करण्यात आलेली वाढ शासन निर्णयाच्या माध्यमातून लागू केली आहे.

आता महाराष्ट्रातील शिक्षण सेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2023 पासून मानधन वाढ मिळणार आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा देण्याचा निर्णय देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

असं राहील आता शिक्षण सेवक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुधारित मानधन

या निर्णयाची अंमलबजावणी आता होणार असल्याने राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षकांना प्रति महिना १६००० रु. मानधन मिळणार आहे.

तसेच जे शिक्षक माध्यमिक शाळेत कार्यरत असतील अशा शिक्षकांना १८००० रु. प्रति महिना मानधन देऊ केल जाणार आहे.

शिवाय उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय मधील शिक्षकांना २०००० रु.मानधन आता मिळणार आहे. 

शिवाय जे शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ सेवा देत आहेत त्यांना १४००० रु. मानधन मिळणार आहे.

तसेच प्रयोगशाळा सहायक १२००० रु. कनिष्ठ लिपिक १०००० रु. आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी ८००० रु. मानधन आता त्यांना देऊ केलं जाणार आहे.

अखेर देव पावला ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर; अधिसूचना जारी