ब्रेकिंग ! शिंदे-फडणवीस सरकारचं ‘या’ 2 लाख 20 हजार कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट ; वेतनात 10% वाढ, मिळणार नवीन स्मार्टफोन

Ajay Patil
Published:
state employee news

Maharashtra State Employee Payment : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारकडून मोठ-मोठे निर्णय घेतले जात आहेत. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला तसेच के पी बक्षी च्या शिफारसी लागू झाल्यात.

तसेच काल म्हणजे 11 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ केली. अशातच आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील 2 लाख 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल दिले जाणार आहेत. हे मोबाईल पोषण ट्रॅकर ॲप युज करण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांना शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

तसेच या कर्मचाऱ्यांना दहा टक्के वेतनात वाढ देखील मिळणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासन याबाबत 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनापर्यंत निर्णय घेणार असल्याचे सदर मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. खरं पाहता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं होतं.

आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 12 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला त्यांच्या प्रलंबित मागण्या नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी बोलावलं होत. दरम्यान आज ही बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली असून बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

अशातच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर ॲप युज करण्यासाठी नवीन मोबाईल उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगितले जात असून या कर्मचाऱ्यांसाठी 140 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के एवढी वाढ केली जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

निश्चितच, सदर मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे शासनाने निर्णय घेतल्यास राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe