Maharashtra Top Engineering Colleges : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात आणि शाळा कॉलेजमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
तर, दुसरीकडे कॉलेजची सुद्धा शोधाशोध केली जात आहे आणि यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या पूर्णपणे व्यस्त आहेत. दरम्यान जर तुम्हालाही बारावीनंतर इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

विशेषता ज्यांना महाराष्ट्रातच शिक्षण घ्यायचं असेल आणि ते महाराष्ट्रातील टॉप इंजीनियरिंग कॉलेजची माहिती शोधत असतील तर त्यांच्यासाठी आजची बातमी अधिक खास राहणार आहे कारण की आज आपण महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती जाणून घेणार आहोत आणि यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मेट्रो शहरांमधील कॉलेजेसचा सुद्धा समावेश आहे.
त्यामुळे जर तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मेट्रो शहरांमध्ये जाऊन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ इच्छित असाल तर तुम्ही आजची बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. आज आम्ही तुम्हाला ज्या कॉलेजची माहिती सांगणार आहोत त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर ऍडमिशन मिळाले तर नक्कीच तुमचे पुढील आयुष्य सेट होऊ शकते.
कारण की, या कॉलेजेस मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी लागू शकते. या कॉलेजेस मधील कॅम्पस प्लेसमेंट फारच उत्कृष्ट असून येथून जर तुम्हाला प्लेसमेंट मिळाली तर नक्कीच लाखो रुपयांचा पगार तुमच्या खिशात येणार आहे.
ही आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस
Indian Institute Of Technology म्हणजे IIT Bombay : महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेजेस मध्ये आयआयटी बॉम्बे चा पहिला नंबर लागतो. या कॉलेजची ऑल इंडिया रँकिंग 3 आहे. NIRF ने ही रँकिंग दिलेली आहे. या कॉलेजची फी ही जवळपास आठ लाख रुपये इतकी आहे, महत्वाची बाब अशी की या कॉलेजमधील सरासरी प्लेसमेंट पॅकेज हे 17.92 लाख रुपये इतके आहे. नक्कीच जर तुम्हाला मुंबईतील कॉलेजमध्ये इंजीनियरिंग चे शिक्षण घ्यायचे असेल तर ही कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.
VNIT नागपूर : विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर हे सुद्धा महाराष्ट्रातील एक टॉप इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या कॉलेजची ऑल इंडिया रँकिंग 39 आहे. या कॉलेजची फी पाच लाख रुपये एवढी आहे. जर तुम्हाला नागपूरमध्ये इंजीनियरिंगचे शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही हे कॉलेज निवडू शकता. या कॉलेजचे कॅम्पस सुद्धा फारच छान आहे. इथे विदर्भातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात याशिवाय राज्यातील इतरही कानाकोपऱ्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाला प्राधान्य दाखवत आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई : राजधानी मुंबईतील आणखी एक बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. या कॉलेजची ऑल इंडिया रँकिंग 41 इतकी आहे. या कॉलेजची फी फक्त 60 हजार रुपये एवढी आहे. मुंबई शिक्षण घ्यायच असेल तर तुम्ही या कॉलेजचा सुद्धा विचार करू शकता.
कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे : हे देशातील सर्वाधिक जुन्या अभियांत्रिकी कॉलेजेसपैकी एक आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातील हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या आवडीचे आहे. इथेही देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तुम्हाला इंजीनियरिंग करायची असेल आणि तीही पुण्यातून करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता.
MIT WPU : पुण्यातील कोथरूड मधील हे कॉलेज सुद्धा विद्यार्थ्यांचे आवडीचे आहे. तुम्हाला जर पुण्यातून इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजला पसंती देऊ शकता. या कॉलेजचे कॅम्पस सुद्धा फारच छान आहे.
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, मुंबई : VJTI, Mumbai हे सुद्धा महाराष्ट्रातील एक टॉपचे इंजीनियरिंग कॉलेज आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट मुंबईतील एक प्रसिद्ध अभियांत्रिकी कॉलेज असून या कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यास तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी : पुण्यातील कोंढवा येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सुद्धा महाराष्ट्रातील एक टॉप 10 मधील इंजिनिअरिंग कॉलेज आहे. पुण्यात इंजीनियरिंग करायची असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग : मुंबईतील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हे सुद्धा राज्यातील एक प्रमुख अभियांत्रिकी कॉलेज आहे. महाराष्ट्रातील टॉप टेन कॉलेजमध्ये या कॉलेजचा सुद्धा समावेश होतो. देशातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतात.
डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी : महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस पैकी एक म्हणजेच डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. पुण्यातील पिंपरी येथील हे कॉलेज इंजीनियरिंग साठी एक बेस्ट कॉलेज आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. राज्याबाहेरील विद्यार्थी सुद्धा या कॉलेजला प्राधान्य दाखवतात हे विशेष.
G.H. Raisoni College Of Engineering, Nagpur : उपराजधानी नागपूर येथील हे अभियांत्रिकी कॉलेज विद्यार्थ्यांच्या पसंतीचे आहे. हे कॉलेज महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसपैकी एक आहे. जर तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले तर तुमचे आयुष्य नक्कीच सेट होणार आहे.