Maharashtra Vande Bharat Railway : पुढचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की पुढल्या महिन्यात राज्यातील काही शहरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि परभणीमधील रेल्वे प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस ला नांदेड पर्यंत चालवण्यास परवानगी दिली आहे. रेल्वेने मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा विस्ताराला मंजुरी दिल्यापासून परभणी आणि नांदेड मधील प्रवासी ही गाडी केव्हापासून मुंबई ते नांदेड अशी धावणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आता याच संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.

मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस कधी धावणार?
परभणी आणि नांदेडसहीत संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुढील महिन्यात मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 26 ऑगस्ट 2025 पासून मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होईल अशी माहिती हाती आली आहे. स्वतः खासदार अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
भाजप खासदार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून 26 ऑगस्ट पासून मुंबई – नांदेड वंदे भारत ट्रेन रुळावर धावणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हणून आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक, ही गाडी कोणत्या स्थानकावर थांबणार याची माहिती पाहणार आहोत.
कसे राहणार सीएसएमटी – नांदेड वंदे भारतचे वेळापत्रक?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी पाच वाजता सोडली जाणार आहे, मग पाच वाजून 40 मिनिटांनी परभणी रेल्वे स्थानकावर, सात वाजून वीस मिनिटांनी जालना रेल्वे स्थानकावर, 8:13 वाजता छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानकावर, नऊ वाजून 58 मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवर,
अकरा वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर, एक वाजून वीस मिनिटांनी कल्याण जंक्शनवर, एक वाजून 40 मिनिटांनी ठाणे रेल्वे स्थानकावर, दोन वाजून आठ मिनिटांनी दादर रेल्वे स्थानकावर आणि दोन वाजून 25 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे.
ही गाडी मनमाड येथे पाच मिनिटांसाठी थांबणार आहे आणि उर्वरित सर्व थांब्यांवर ही गाडी दोन मिनिटांसाठी थांबेल. परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर मुंबई सीएसएमटी येथून ही गाडी एक वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे, मग एक वाजून 17 मिनिटांनी दादर, एक वाजून 40 मिनिटांनी ठाणे, दोन वाजून चार मिनिटांनी कल्याण,
चार वाजून 18 मिनिटांनी नाशिक रोड, पाच वाजून 18 मिनिटांनी मनमाड जंक्शन, 6 वाजून 48 मिनिटांनी छत्रपती संभाजी नगर, 07:43 वाजता जालना, 9 वाजून 33 मिनिटांनी परभणी आणि दहा वाजून पन्नास मिनिटांनी नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी प्रत्येक रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांसाठी थांबा घेणार आहे.
कोण – कोणत्या स्थानकावर थांबणार वंदे भारत ट्रेन
सध्या मुंबई – जालना वंदे भारत एक्सप्रेस ज्या – ज्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेत आहे त्या सर्व रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबा घेईल आणि जालनाच्या पुढे परभणी आणि मग नांदेडला थांबणार आहे. म्हणजे नांदेड – मुंबई वंदे भारत ट्रेन परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.