भारतीय हवामान विभागाचा गंभीर ईशारा; आता ‘या’ जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस !

Ajay Patil
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. या निसर्गाच्या लहरीपणामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे बाजारात शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाहीये.

कापूस, सोयाबीन समवेतच कांदा अतिशय कवडीमोल दरात विक्री होत आहे. अशातच आता या रब्बी हंगामातील पिके देखील अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे क्षतीग्रस्त झाली आहेत. शिवाय अजूनही राज्यातील हवामान पूर्णपणे निवळलेले नाही. राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांना ‘या’ पालिकेच्या निर्णयामुळे बसतोय मोठा फटका ! डेक्कन क्वीनला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात थांबा नाही, प्रकरण काय? पहा….

भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला वादळी पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे राहणार आहेत. कारण की पुढील 24 तासात राज्यातील काही भागात गारपीट आणि वादळी पाऊस होणार आहे. यामध्ये उत्तर कोकण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोकण मध्ये पालघर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर याही जिल्ह्यात पुढील 24 तासात पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

याबरोबरच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे.

हे पण वाचा :- 4थी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ कोर्टात निघाली भरती, ‘ही’ रिक्त पदे भरली जाणार; पगार मिळणार तब्बल 50 हजारापेक्षा अधिक, पहा डिटेल्स

निश्चितच या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची शक्यता लक्षात घेता अधिक सजग आणि सतर्क रहावे लागणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात तापमान वाढत आहे त्यामुळे उकाडा नागरिकांसाठी असह्य बनला आहे. एकंदरीत तापमान वाढ आणि अवकाळी पाऊस यामुळे राज्यात मिश्र वातावरणाची अनुभूती नागरिकांना होत आहे.

हे पण वाचा :- पुणे रिंगरोडबाबत मोठी बातमी; मे महिन्यात होणार ‘हे’ महत्वाचं काम, पहा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe