पंजाबराव डख : 14 मार्चपासून अहमदनगर, नासिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, नांदेड, लातूर अन ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस पाऊस पडणार!

Ajay Patil
Published:
maharashtra weather update

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी आज 13 मार्च 2023 रोजी नासिक जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे. याशिवाय उद्यापासून अर्थातच 14 मार्च 2023 पासून ते 19 मार्च 2023 पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या कालावधीमध्ये राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस पडणार आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार या कालावधीत तेलंगणा, आंध्र प्रदेश, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, नासिक, नासिक जिल्ह्यातील निफाड व आजूबाजूचा परिसर तसेच नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे या कालावधीमध्ये पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीटीची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. तेलंगाना, यवतमाळ, नांदेड आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज आहे. 14 मार्चपासून सुरू होणारां अवकाळी पाऊस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पडणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे 14 मार्च ते 19 मार्च दरम्यान राज्यात पावसाळ्यात जसा पाऊस पडतो त्या पद्धतीचा पाऊस पडेल असा अंदाज डक यांनी वर्तवला आहे. निश्चितच नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस पडला आहे. अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान मोठा पाऊस झाला आहे. खानदेश मधील धुळे जिल्ह्यात तर गारपीट देखील झाली होती.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा डखं यांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पंजाबरावांचा हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल उत्पन्न मिळाले आहे. आता पुन्हा एकदा रब्बी हंगामात तोच सिलसिला कायम होत असल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकत आहे.

निश्चितच पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी काढण्यासाठी आलेल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे असून काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक राहणार आहे. तसेच वादळी वारा आणि गारपीट देखील काही जिल्ह्यात होणार असल्याने पशुधनाचीही काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe