Mahindra Scorpio-N Z8T : महिंद्रा स्कॉर्पिओ-एन या आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचा एक नवीन आणि स्मार्ट अवतार आता बाजारात आला आहे. या नव्या व्हेरिएंटच नाव आहे Z8T, आणि विशेष म्हणजे यामध्ये आता लेव्हल २ एडीएएस (ADAS – Advanced Driver Assistance System) तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
म्हणजेच, ही गाडी केवळ डिझाईन आणि पॉवरमध्येच नव्हे, तर सुरक्षिततेच्या बाबतीतही आता आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. महिंद्रानं ही घोषणा करताच अनेक कारप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Scorpio-N Z8T फीचर्स
Z8T मध्ये 12-स्पीकरचा सोनी प्रीमियम ऑडिओ सिस्टम, फ्रंट कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (EPB), आणि व्हेंटिलेटेड सीट्ससारखे फीचर्स सुद्धा दिले आहेत. त्यामुळे ही कार आता एक परिपूर्ण ड्रायव्हिंग अनुभव देणारी एसयूव्ही बनली आहे.
Scorpio-N Z8T किंमत
Z8T व्हेरिएंटची किंमत ₹20.29 लाखांपासून सुरू होते. आणि स्कॉर्पिओ-एनचं हे अपग्रेड त्या लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे, जे स्टाईल, पॉवर आणि सुरक्षा शोधत आहेत. विशेष म्हणजे, स्कॉर्पिओ-एनने आपल्या बाजारात ३ वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून, आजपर्यंत २.५ लाखांहून अधिक ग्राहकांनी याला आपली पहिली पसंती दिली आहे.
Scorpio-N Z8T इंजिन
ह्या कारच्या इंजिनबद्दल सांगायचं झालं, तर 2025 मध्ये स्कॉर्पिओ-एनच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही कार 2.0 लिटरचं mStallion पेट्रोल आणि 2.2 लिटरचं mHawk डिझेल इंजिनसह येते. पेट्रोल वर्जनमध्ये 203 PS ताकद मिळते आणि 370 ते 380 Nm पर्यंत टॉर्क मिळतो. डिझेल वर्जनमध्ये 175 PS आणि 370 ते 400 Nm पर्यंतचा दमदार टॉर्क आहे. तसेच, ही गाडी 2WD आणि 4WD अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
Scorpio-N Z8T ADAS 2.0 तंत्रज्ञान
Z8T व्हेरिएंटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे फीचर्स देण्यात आले आहेत ज्या फीचर्समुळे कार चालवणं सुरक्षित आणि सोपं झालं आहे.
१) फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग (एखादी अपघाताची शक्यता ओळखून आधीच इशारा देणं),
२) अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (गाडी आपल्या समोरच्या वाहनाच्या स्पीडनुसार आपोआप वेग नियंत्रित करते),
३) स्पीड लिमिट असिस्ट (गतीमर्यादा लक्षात ठेवणं),
४) फ्रंट व्हेईकल स्टार्ट अलर्ट (समोरचं वाहन हलल्यावर सूचना देणं)
Dominance just got smarter.
Scorpio-N now comes fully loaded with Level-2 ADAS. #ScorpioN #ScorpioNWithADAS #ADAS #BigDaddyOfSUVs #Mahindra pic.twitter.com/U9rR3BST08— Mahindra Scorpio (@MahindraScorpio) June 27, 2025