भारताने आता प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून अवकाश क्षेत्र देखील याला अपवाद राहिलेले नाही. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी अनन्यसाधारण असून अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये जगात जे काही आघाडीचे देश आहेत त्यांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला आहे. याच अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगतीचे द्योतक म्हणजे इस्रो ने पाठवलेले भारताचे चंद्रयान 3 हे होय.
चंद्रावर पाठवण्यात आलेले चंद्रयान तीन हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार असून आतापर्यंत कोणत्याही देशाला दक्षिण ध्रुवावर पोहोचता आलेले नाही. जर भारताचे चंद्रयान 3 ने दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. परंतु या स्पर्धेमध्ये रशिया देखील आघाडीवर असून रशियाने देखील लुना 25 हे यान दक्षिण ध्रुवावर उतरवण्याच्या दृष्टिकोनातून अवकाशात सोडले आहे. त्यामुळे आता भारताचे चंद्रयान तीन दक्षिण ध्रुवावर अगोदर पोहोचणार की रशियाचे लुना 25 हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
22 दिवसात चंद्रयान 3 पोहोचले चंद्राच्या कक्षेत
चंद्रयान 3 साठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असून आज इस्रोने चंद्रयान 3 चे प्रोपलशन मॉड्युल लॅन्डर पासून वेगळे करणार असून 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान तीनची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग होईल. चांद्रयान मध्ये तीन प्रकारचे मॉड्युल असून ते म्हणजे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्सन हे होय.
यातील लँडर व रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून त्या ठिकाणी 14 दिवस प्रयोग करणार आहे. तसेच प्रोपलशन मॉड्युल हे चंद्राच्या कक्षेत राहणारा असून पृथ्वीवरून जे काही किरणोत्सार येतात त्याचा अभ्यास करणार आहे. तसेच दक्षिण ध्रुवावर जे काही लँडर व रोव्हर उतरणार आहेत ते चंद्रावरील पाण्याचा शोध घेणार आहेत.
रशियाचे लुना 25
रशियाचे लुना 25 हे यान चंद्राच्या शंभर किलोमीटरच्या कक्षेत पोहोचण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले असून तब्बल 47 वर्षाच्या नंतर रशियाने चंद्रावर मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत जगाच्या पाठीवर ज्या काही चंद्र मोहिमा देशांकडून पार पाडण्यात आल्या त्या प्रामुख्याने चंद्राच्या विषुववृत्तावर पोचले आहेत. यामध्ये चंद्रावरील मातीचे नमुने घेणे व बर्फाचे अस्तित्व शोधणे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास या मोहिमेच्या काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत.
जर आपण रशियाच्या लुना 25 या यानाचा विचार केला तर त्याची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग ची तारीख साधारणपणे 21 ते 23 ऑगस्ट आहे आणि चांद्रयान 3 ची 23 ते 24 ऑगस्ट आहे. दोघांच्या तारखा खूप जवळ असल्याकारणाने चंद्रावर अगोदर कोण पोहचणार याची उत्सुकता जगाला लागली आहे.
या सगळ्या मोहिमेची माहिती देताना इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटले की यामध्ये लँडिंग चा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग 30 किलोमीटर उंचीवरून अंतिम लँडिंग पर्यंत आणण्याची प्रक्रिया आणि यान आडव्या स्थितीतून उभ्या स्थितीकडे नेण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची असून यामध्येच क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात रशियाचे लुना 25 चंद्रावर पहिले पोहोचते की भारताचे चंद्रयान तीन हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.