Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 50 हजार महिलांचे फॉर्म झाले रद्द! अशा महिलांना मिळतील का पैसे?

जवळपास 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. परंतु ज्या महिलांचे अर्ज रद्दबातल ठरवण्यात आलेले आहेत त्या महिलांना मात्र काळजी करण्याची गरज नसून त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा याकरिता अर्ज करता येणार आहे.

Ajay Patil
Published:
majhi ladki bahin yojana

Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र मध्ये सध्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात चर्चेला असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना होय. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली व या योजनेच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील पात्र महिलांना  प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.

याकरिता राज्यातून दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत व यातून जे अर्ज वैध ठरले त्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली व जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिने मिळून तीन हजार रुपयांचा लाभ पात्र महिलांना दिला जात आहे.

परंतु यामध्ये मात्र प्राप्त झालेल्या अर्जांमधून पन्नास हजार महिलांचे अर्ज रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता या रिजेक्ट झालेल्या अर्जदारांना पुढे पैसे मिळतील का नाही? याबाबत देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

 पन्नास हजार महिलांचे फॉर्म झाले रिजेक्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले व त्यातील जवळपास 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. परंतु ज्या महिलांचे अर्ज रद्दबातल ठरवण्यात आलेले आहेत त्या महिलांना मात्र काळजी करण्याची गरज नसून त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा याकरिता अर्ज करता येणार आहे.

त्यामुळे आता अशा महिलांना खूप मोठा प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे. परंतु एका बाजूने दिलासा मिळाला आहे,परंतु दुसऱ्या बाजूने मात्र एक धक्का  देखील बसणार आहे. ज्या महिलांनी सप्टेंबर आधी अर्ज केलेले नाहीत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिने मिळून जो काही तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार होता तो आता मात्र मिळणार नाही.

ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केलेले आहेत त्यांना हा 3000 रुपयांचा लाभ दिला जात आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे एक सप्टेंबर नंतर या योजनेकरिता नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ देण्यात येणार नाही.

ज्या महिन्यात आता महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. दुसरे म्हणजे प्राप्त झालेल्या दोन कोटी चाळीस लाख अर्जांमधून दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे व राहिलेले 40 ते 42 लाख महिलांची बँक खाते,

आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्यामुळे ते आता लिंक करण्याचे काम सुरू झाले आहे व ते झाल्यानंतर उर्वरित महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe