Make Money From Mobile : हातातील स्मार्टफोनचा वापर करा आणि घरी बसून पैसे कमवा ! हे आहेत आठ पर्याय

Published on -

Make Money From Mobile : पैसा हा जीवन जगण्यासाठी आवश्यक असल्यामुळे प्रत्येक जण नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून पैसा मिळवत असतो. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी आहे.

त्यातल्या त्यात व्यवसाय जरी करायचे ठरले तरी देखील त्यासाठी लागणारा पैसा उभा करणेदेखील खूप जिकीरीचे काम आहे. त्यामुळे आजकालची तरुणाई जॉब मिळत नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात तणावात वावरताना दिसतात. परंतु यामध्ये जर आपण काही व्यवसायांचा शोध घेतला तर तुम्ही विना भांडवल असे व्यवसाय किंवा काम करून घरबसल्या पैसे कमवू शकतात.

याकरता तुम्ही तुमच्या हातातील स्मार्टफोनचा वापर करून पैसे मिळवून बेरोजगारीवर मात करू शकतात. आपण जे नेहमी व्हाट्सअप व फेसबुक, सोशल मीडिया ॲप्स किंवा google इत्यादीचा वापर करून आपण स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन पैसे मिळवू शकतो. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये मोबाईलचा वापर करून घरी बसून कसे पैसे मिळवू शकतात किंवा त्याचे मार्ग कोणते? याबद्दलची माहिती घेऊ.

हातातील स्मार्टफोनचा वापर करा आणि घरी बसून पैसे कमवा

मोबाईलचा वापर करून पैसे मिळवायचे असतील तर तुमच्याकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. त्यासोबतच चांगली इंटरनेट कनेक्शन व यातील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तुमचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे मिळवू शकतात.

1- ब्लॉगिंग- समजा तुम्हाला एखाद्या विषयाची भरपूर माहिती असेल तर त्यामधून तुम्ही इंटरनेटचा वापर करून ब्लॉगिंग करण्याचे काम करू शकतात व तुम्हाला माहिती असलेल्या विषयाची माहिती तुम्ही इतर लोकांना देऊ शकतात. एखाद्या विषयामध्ये तुम्हाला चांगले ज्ञान किंवा माहिती असेल व तुम्हाला लेखन करण्याची आवड असेल तर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून ब्लॉगिंग सुरू करून तुम्ही लिहिलेले लेख पब्लिश करू शकता व तुमच्या मोबाईल फोन द्वारे तुमचा ब्लॉग चांगला व्यवस्थापित करून घरी बसून पैसे कमवू शकतात.

2- सोशल मीडिया एप्लीकेशनचा वापर- सध्या प्रत्येक जण सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर वापरतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की हे सोशल मीडिया ॲप तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्यासाठी खूप महत्त्वाची मदत करू शकतात. असे एप्लीकेशनच्या माध्यमातून फॉलोवर्स वाढवणे, व्हूज वाढवणे तसेच लाईक वाढवणे इत्यादी माध्यमातून तुम्हाला घरी बसून पैसे कमवता येतात. याकरिता तुम्ही whatsapp आणि instagram तसेच फेसबुक या सोशल मीडियाचा वापर करू शकतात. या सोशल मीडिया एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी फक्त स्मार्टफोनच्या आवश्यकता आहे.

3- अफिलेट मार्केटिंग – त्यामध्ये कुठल्याही कंपनीचे उत्पादन किंवा सेवा विक्री करण्याकरिता कमिशन मिळते. या अंतर्गत कंपनीचे उत्पादन आणि सेवा जितकी जास्तीत जास्त विकली जाईल तितके संबंधित व्यक्तीला जास्तीचे कमिशन मिळते. आजकालच्या कालावधीमध्ये मार्केटिंगचा हा प्रकार खूप प्रसिद्ध झाला असून हादेखील एक ऑनलाईन पैसे कमवण्याचा चांगला मार्ग आहे. आपल्याला माहित आहे की सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड असून अशा मध्ये जर तुम्ही अॅफिलेट मार्केटिंग केली तर तुम्ही सहज घरी बसून चांगले पैसे मिळवू शकतात.

4- ड्रीम 11- ड्रीम 11 सगळ्यांना माहिती असणारे एप्लीकेशन असून जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल आणि तुम्हाला क्रिकेट खेळाबद्दल चांगले ज्ञान असेल तर तुम्ही या ड्रीम इलेव्हन खेळाच्या माध्यमातून घरी बसून चांगले पैसे मिळवू शकतात. तुम्हाला जर क्रिकेट बद्दल ज्ञान चांगले असेल त्या प्रमाणात तुम्हाला यामध्ये फायदा मिळू शकतो. आपल्याला माहित आहे की अंतर्गत दोन संघांमध्ये सामना होतो आणि सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंची निवड या ॲप्लिकेशन वर केली जाते आणि जर तुमच्याकडून सिलेक्ट केल्या गेलेल्या खेळाळूने सामन्या दरम्यान चांगली कामगिरी केली तर तुमची ड्रीम इलेव्हन मधील जिंकण्याची शक्यता वाढते. या माध्यमातून तुम्ही घरी बसून चांगले पैसे मिळवू शकतात.

5- मोबाईल ॲप्लिकेशन्स- आज विचार केला तर स्मार्टफोनमध्ये असे अनेक एप्लीकेशन आहेत ज्या माध्यमातून देखील तुम्ही पैसे मिळवू शकतात. आता यामध्ये बनावट एप्लीकेशन ओळखता येणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे एप्लीकेशनचे काळजीपूर्वक चौकशी करूनच संबंधित ॲप्स वापर करणे गरजेचे आहे. जर आपण काही मोबाईल ॲप्लिकेशनचा विचार केला तर यामध्ये एमपीएल, गुगल ओपिनियन रिवार्ड, अर्न टॉक टाईम, टास्कबड आणि वन ऍड यासारखे एप्लीकेशन महत्त्वाचे आहेत. याशिवाय अनेक एप्लीकेशन असून ते संपूर्णपणे सुरक्षित देखील आहेत. अशा एप्लीकेशनचा वापर करून देखील तुम्ही घरी बसून पैसे मिळवू शकतात.

6- लिंक सॉर्टिंग- आज लिंक सॉर्टिंग बद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. हे असे काम आहे की ज्या अंतर्गत कोणत्याही वेबसाईट ची लिंक लहान करून शेअर करण्याचे काम केले जाते. यामध्ये तुम्ही कोणतीही गुंतवणूक केल्याशिवाय आणि कुठलेही कष्ट न करता सहजपणे इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे मिळू शकतात. याअंतर्गत तुम्हाला लिंक लहान करावी लागते व शक्य तितक्या लोकांना शेअर करावी लागते. या लिंकला जितके जास्त लोक क्लिक करतील तेवढं तुमचे उत्पन्न वाढते.

7- गुगल मॅप- गुगल मॅपचा वापर करून देखील तुम्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे मिळवू शकतात. याकरता तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनची गरज असून गुगल मॅपचा योग्य वापर कसा करायचा हे तुम्हाला माहिती करून घेणे गरजेचे आहे. आजच्या युगामध्ये बरेच व्यापारी त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्याकरिता गुगलवर ती सूचीबद्ध किंवा लिस्टेड करतात. गुगलमध्ये व्यवसाय लिस्ट केल्यानंतर त्याची पडताळणी करावी लागते. गुगलवर असे अनेक व्यवसाय असतात व त्यामुळे बऱ्याच व्यवसायाची पडताळणी होत नाही. पडताळणी करून घेऊ शकतात व व्यापाऱ्याकडून 1000 ते 2000 रुपये तुम्हाला या माध्यमातून मिळतात. तुम्ही इतर लोकांचा व्यवसाय गुगल मॅपवर जोडू शकता आणि त्यांच्याकडून शुल्क आकारू शकता. परंतु याकरिता तुम्हाला गुगल मॅपची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. तसेच गुगल मॅपचा वापर करून तुम्ही लोकल गाईड बनून पैसे मिळू शकतात.

8- फोटोंची विक्री- जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही मोबाईलचा वापर करून या माध्यमातून खूप पैसे मिळवू शकतात. याकरिता तुमच्या स्मार्टफोनमध्ये उत्तम कॅमेरा असणे गरजेचे आहे व तुम्ही युनिक फोटो काढणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच प्रवासाचे फोटोंना अधिक मागणी असते. गुगलमध्ये अनेक वेबसाईट आणि एप्लीकेशन आहे जे फोटो विक्रीचे काम करतात. परंतु यामध्ये ड्रीम्स टाईम, शटर स्टॉक, कंट्रीब्यूटर, क्लेशॉट, स्नॅप वायर इत्यादी एप्लीकेशन 100% विश्वासहार्य मानले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe