मुंबईतल्या घराचं स्वप्न म्हाडाकडून होणार पूर्ण ! Mhada च्या 4 हजार 83 घरांच्या लॉटरीची A टू Z माहिती वाचा एका क्लिकवर

Mhada Mumbai Lottery Timetable : मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्या विशेषता म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या व्यक्तींना म्हाडाकडून मोठ गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे चार हजार 83 सदनिकांसाठी म्हाडा कडून आज जाहिरात काढली जाणार आहे.

आज म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि आजपासूनच यासाठी अर्ज देखील करता येणार आहे. अर्जाला आज 22 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजेपासून सुरुवात होणार आहे. आजपासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणा स्वीकृतीला सुरुवात होणार आहे.

आम्ही आपणांस सांगू इच्छितो की मुंबई मंडळाने यापूर्वी 2019 मध्ये घरांसाठी सोडत काढली होती. तेव्हापासून मुंबई मंडळाच्या कार्यक्षेत्रात घर सोडतीसाठी लॉटरी काढली गेली नाही. म्हणून मुंबई मंडळाच्या लॉटरी कडे अनेकांचे लक्ष लागून होते. गेल्या दोन वर्षांपासून याकडे नागरिकांचे लक्ष होते.

दरम्यान आता मुंबई मंडळाची सदनिकांसाठीची सोडत आजपासून जारी होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या 4 हजार 83 सदनिकांच्या सोडती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण; आता मार्गांवर वाहनासह साहित्याची वाहतूक शक्य, प्रवाशांसाठी केव्हा होणार खुला?

कोण-कोणत्या भागात आहेत घरे?

या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील 2788 घरांचा समावेश आहे. यात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील पंतप्रधान आवास योजनेमधील 1947, अँटॉप हिल मधील 417, विक्रोळीच्या कम्मनवार नगर मधील 424 घरांचा समावेश आहे.

या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 34 घरांचा समावेश आहे. यामध्ये गोरेगाव पहाडी परिसरातील 736, लोकमान्यनगर दादर, अॅन्टॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर गोरेगाव पश्चिम, डी. एन. नगर अंधेरी, पंतनगर घाटकोपर, कन्नमवारनगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीरनगर कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड इत्यादी भागातील घरांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या घर सोडतीत मध्यम उत्पन्न गटासाठी 140 घरांचा समावेश करण्यात आला आहे. यात उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकारनगर चेंबूर, लोकमान्यनगर दादर, अॅन्टॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबूर, चांदिवली पवई, गायकवाडनगर मालाड, प्रतीक्षानगर सायन, चारकोप कांदिवली येथील घरांचा समावेश राहणार आहे.

उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिकांचा समावेश असून, या या 2023 mumbai mhada lottery मध्ये उच्च उत्पन्न गटासाठी 120 घरे राहणार आहेत. यात जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथील घरांचा समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- 12वी पास, पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! भाभा अनुसंशोधन केंद्रात ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, आजच करा अर्ज

घरांच्या किंमती किती राहणार?

याबाबत म्हाडाच्या माध्यमातून अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. यामुळे मुंबई मंडळाच्या घरांच्या किमती किती राहणार याबाबत नागरिकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. परंतु काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील पहाडी गोरेगाव पश्चिम येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत समाविष्ट घरांच्या किमती या जवळपास 34 लाखांपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

घर सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक / महत्वाच्या तारखा

मुंबई मंडळ घर सोडत 2023 जाहिरात :- 22 मे 2023 ला

अर्ज विक्री आणि स्वीकृती :- 22 मे 2023 दुपारी तीन वाजेपासून

अर्जाची अंतिम दिनांक :- नोंदणी केलेल्या व्यक्तींना 26 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

अनामत रक्कम भरण्यासाठी अंतिम दिनांक :- जर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग द्वारे ऑनलाईन अनामत रक्कम भरणा करायचा असेल तर 26 जून 2023 रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत मुदत राहणार आहे.

तसेच अनामत रकमेचा भरणा बँकेच्या माध्यमातून म्हणजेच आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे 28 जून 2023 पर्यंत करता येणार आहे.

प्रारूप यादी केव्हा येणार :- या घर सोडतीसाठी सादर केलेल्या अर्जांची प्रारूप यादी चार जुलै 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप यादी केव्हा अन कुठे पाहता येणार :- प्रारूप यादी 4 जुलै 2023 रोजी तीन वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.inhttps://www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे.

हरकत केव्हा दाखल करता येणार :- प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून हरकत दाखल करता येणार असून सात जुलै पर्यंत हरकती स्वीकारल्या जातील.

स्वीकृत अर्जाची अंतिम यादी केव्हा :- प्राप्त अर्जांची अंतिम यादी 12 जुलै 2023 रोजी जाहीर होणार आहे. ही यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे.

लॉटरी केव्हा निघणार :- 18 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात ही लॉटरी काढली जाणार आहे. यानंतर, विजयी ठरलेल्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. जे अर्जदार यामध्ये अयशस्वी ठरतील अशा अर्जदारांची अनामत रक्कम परत केली जाईल. 

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात झाली मोठी वाढ; कोणत्या राज्यात किती DA? वाचा…