Mhada News : म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे म्हाडाने 5285 घरांसाठी नवीन लॉटरी जाहिरात काढली आहे. ही जाहिरात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून काढण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळांने काढलेल्या या लॉटरीमध्ये पाच हजार 285 घरे आणि 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
दरम्यान आता आपण कोकण मंडळाच्या या लॉटरीमध्ये कोणत्या भागातील घरांचा समावेश आहे आणि या लॉटरीचे वेळापत्रक कसे राहणार याची डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. म्हणूनच जर तुम्हाला कोकण मंडळाच्या या लॉटरीमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही आजची ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी.

या घरांसाठी लॉटरी
मिळालेल्या माहितीनुसार कोकण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या ह्या लॉटरीमध्ये ठाणे शहर व जिल्ह्यातील घरांचा, पालघर जिल्ह्यातील वसई येथील घरांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांचा सुद्धा यात समावेश आहे.
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत 20 टक्के सर्व समावेशक योजनेची 565 घरे आहेत. 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेची एकूण तीन हजार दोन घर समाविष्ट आहेत. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व इतर विखुरलेले 1677 घरं आहेत.
कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (50 % परवडणारी घर ) योजनेत 41 घर समाविष्ट आहेत. दरम्यान आता आपण या घरांसाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार तसेच लॉटरी कधी निघणार? याच संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
14 जुलै 2025 : 14 जुलै दुपारी एक वाजता अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
13 ऑगस्ट 2025 : 13 ऑगस्ट पर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहेत.
14 ऑगस्ट 2025 : घरांसाठीची अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
21 ऑगस्ट 2025 : या दिवशी स्वीकारलेल्या अर्जाची प्रारूप यादी जाहीर होणार आहे.
25 ऑगस्ट 2025 : जाहीर झालेल्या प्रारूप यादीवर काही आक्षेप असल्यास दावे व हरकती नोंदवण्यासाठी 25 ऑगस्ट पर्यंतची मुदत राहणार आहे.
1 सप्टेंबर 2025 : या दिवशी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी जाहीर होणार आहे. हीच यादी पुढे लॉटरीसाठी जाईल, म्हणजेच याच अर्जदारांमधून विजेत्या अर्जदारांची निवड होणार आहे.
3 सप्टेंबर 2025 : या दिवशी सकाळी दहा वाजेला संगणकीय सोडत म्हणजेच लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरी जाहीर झाल्यानंतर विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना घराचे वितरण केले जाईल. ज्या अर्जदारांना घर मिळणार नाही त्यांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाणार आहे.