प्रतीक्षा संपली ! Mhada ने ‘या’ भागातील 5,000 घरांसाठी जाहिरात काढली, कधीपासून अर्ज करता येणार ? वाचा….

Mhada News : म्हाडा प्राधिकरणाकडून आपल्या विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता करून दिली जात आहे. खरे तर, राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर अशा विविध महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

यामुळे राज्यातील मोठमोठ्या महानगरांमध्ये घर घेऊ इच्छिणारे सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी नुकतीच पाच हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान कोकण विभागीय मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीसाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 14 जुलै 2025 पासून सुरू झाली असून आज आपण या लॉटरीचे संपूर्ण डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कशी आहे कोकण मंडळाची लॉटरी

कोकण मंडळाने नुकतीच या लॉटरीची जाहिरात काढली आहे. या जाहिरातीनुसार मंडळाकडून कोकणातील 5362 सदनिकांसाठी आणि 77 भूखंडांसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे.

या घरांसाठी आणि भूखंडांसाठी आजपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 13 ऑगस्ट 2025 रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरण्यासाठी 14 ऑगस्ट 2025 रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत मुदत दिलेली आहे.

तसेच अर्ज सादर केलेल्या अर्जदारांची प्रारूप यादी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप यादीनुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 25 ऑगस्ट पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

दरम्यान या लॉटरी अंतर्गत अंतिम पात्रता यादी एक सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास या घरांसाठी आणि भूखंडांसाठी प्रत्यक्षात संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

ही सोडत ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथून काढली जाईल. दरम्यान यामध्ये विजेत्या ठरणाऱ्या अर्जदारांना पुढील योग्य ती कार्यवाही करून घराची चावी दिली जाणार आहे आणि ज्या अर्जदारांना घर लागणार नाहीत त्यांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाणार आहे. 

या भागातील घरांचा समावेश

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीमध्ये ठाणे शहर व जिल्हा तसेच पालघर जिल्ह्यातील वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेतील एकूण 5,285 घरांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस तसेच कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांचा विक्रीसाठी समावेश करण्यात आलेला आहे.

या योजनेत समाविष्ट घरांबाबत बोलायचं झालं तर यात 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 565 घरं, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील 3,002 घरं, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण (व विखुरलेल्या सदनिका) योजनेतील 1,677 घरं आणि म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजतील (50 टक्के परवडणाऱ्या ) 41 घरं अशी एकूण पाच हजार 285 घरांचा समावेश राहणार आहे.