म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून निघणार तब्बल 555 घरांसाठी सोडत! कधी प्रसिद्ध होणार जाहिरात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सध्याची स्थिती ही पाहिली तर खूप अवघड आहे. कारण घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता स्वतःचे घर खरेदी करणे किंवा बांधणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचे स्वतःच्या घराचे स्वप्न हे अपूर्ण राहते.

Ajay Patil
Published:
mhada lottery

Mhada Nashik Lottery 2025:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सध्याची स्थिती ही पाहिली तर खूप अवघड आहे. कारण घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता स्वतःचे घर खरेदी करणे किंवा बांधणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचे स्वतःच्या घराचे स्वप्न हे अपूर्ण राहते.

परंतु मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मात्र म्हाडा आणि सिडको सारख्या शासनाच्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून सोडत काढून परवडणाऱ्या दरामध्ये नागरिकांना घरे उपलब्ध करून दिले जातात हे आपल्याला माहिती आहे.

अशाच प्रकारची सुवर्णसंधी आता नाशिकमध्ये देखील चालून आली असून माडाच्या नाशिक मंडळाला आता वीस टक्के योजनेतील 555 घरे मिळाली आहेत व आता या घरांच्या सोडतीची तयारी नाशिक मंडळाच्या माध्यमातून सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून निघणार 555 घरांची सोडत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% योजनेच्या माध्यमातून खाजगी विकासकांकडून घरे मिळत नव्हते व या पार्श्वभूमीवर म्हाडाने त्या विरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून त्याचाच एक परिणाम म्हणून नाशिक मंडळाला 20 टक्के योजनेतील 555 घरे आता मिळाली आहेत.

त्यामुळे नाशिक मंडळांने या घरांच्या सोडतीची तयारी सुरू केली आहे व त्यानुसार आठवड्यात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जर बघितले तर सर्वसामान्य नागरिकांना घरे मिळावी त्याकरिता खाजगी विकासकांच्या प्रकल्पातील घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याकरिता

राज्य सरकारने 20% घरे राखीव ठेवण्याची योजना आणली व त्यानुसार मुंबई सोडून राज्यातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रातील चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृह प्रकल्पातील 20 टक्के घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे हे बंधनकारक आहे.

असा नियम असताना देखील मात्र नाशिक मधील विकासक 20 टक्क्यातील घरे द्यायला टाळाटाळ करत होते. या योजनेतील घरे मोठ्या संख्येने म्हाडाला न मिळाल्याने दीड दोन वर्षांपूर्वी म्हाडाच्या माध्यमातून विकासकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या व इतकेच नाही तर नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबतीत पाठपुरावा देखील केला होता.

परंतु त्यानंतर देखील मोठ्या संख्येने विकासकांकडून घरे येणे बाकी आहे व आजच्या घडीला अंदाजे तब्बल 5000 घरांची प्रतीक्षा नाशिक मंडळाला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर विकासक आणि नाशिक पालिका या प्रश्न ठोस भूमिका घेत नसल्यामुळे म्हाडाने काही दिवसांपूर्वी नगर विकास विभागाला पत्र लिहिले होते व त्यामध्ये 20 टक्क्यातील घरे मिळावी यासाठी विकासाकांना आदेश देण्याची विनंती करण्यात आलेली होती.

त्यामुळे आता काही प्रमाणात का होईना म्हाडाच्या नाशिक मंडळाला घरे मिळायला आता सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल. आतापर्यंत नाशिक मंडळाला मिळालेल्या 1485 घरांपैकी 1328 घरांची सोडत काढण्यात आली आहे.

तर आता नवीन 555 घरी मिळाली आहेत व या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय नाशिक मंडळाने घेतला असून त्यानुसार आता आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे व या आठवड्याभरात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती देखील समोर आली आहे. 20 टक्क्यात प्राप्त झालेली 555 घरे ही अत्यल्प आणि अल्प गटातील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe