Monsoon 2024:- मान्सून या वर्षाच्या हंगामामध्ये तसे पाहायला गेले तर भारतात अगदी वेळेवर दाखल झाला होता व अगदी सुरुवातीपासून थोडा कालावधी सोडला तर जून महिन्यापासून तर आतापर्यंत पाऊस चांगल्या प्रकारे बरसला.
महाराष्ट्रात बघायला गेले तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगले हजेरी लावली व संपूर्ण महत्वाची धरणे यामुळे भरली व बऱ्याच ठिकाणाचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला.
मान्सूनच्या दृष्टिकोनातून बघितले तर साधारणपणे जून महिन्यात सुरुवात होऊन 17 सप्टेंबर पर्यंत मान्सून माघारी फिरतो किंवा पाऊस संपतो. परंतु यावेळी मात्र ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सून माघारी फिरण्याची चिन्हे नसून तो बरसेल असे दिसून येत आहे. त्याबद्दलचीच माहिती या लेखात बघू.
यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावर्षी मान्सून अगदी वेळेवर दाखल झाला व संपूर्ण कालावधीत पाऊस देखील चांगला बरसत आहे. मात्र पाऊस लांबण्याची यावर्षी शक्यता असून लो प्रेशर सिस्टममुळे मान्सून माघारी जाण्याची वेळ लांबली असल्याची माहिती हवामान खात्याच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.
जर पावसाचा परतीचा प्रवास लांबला तर मात्र कापूस तसेच सोयाबीन, मका यांचे मात्र अतोनात नुकसान यामुळे होऊ शकते. परंतु मात्र रब्बी हंगामामध्ये किंवा हिवाळ्यात जे पीक लागवड केली जाईल त्याला मात्र याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो.
सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लो प्रेशर सिस्टम तयार होत असल्याचे दिसून येत आहे व याच कारणामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होईल.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जो काही पाऊस पडतो तो ला नीना हवामान प्रणालीमुळे पडत असतो व या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर होणार आहे. समजा जर सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथा आठवड्यात पाऊस झाला तर त्याचा विपरीत परिणाम जर पिकांवर झाला तर मात्र थेट महागाईवर याचा परिणाम होऊ शकतो.