Monsoon Update 2023 : पंजाबराव डख हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचा दावा शेतकरी करतात. डख यांचा हवामान अंदाज शेती करताना त्यांना उपयोगीचा ठरतो असं मत शेतकरी कायमच मांडतात.
अशातच सध्या मान्सून 2023 बाबत चर्चा रंगत आहेत. अमेरिकन हवामान विभागाने एल निनो बाबत मोठी माहिती दिली असून यंदा एलनिनो जून पासून सक्रिय राहणार असल्याचा त्यांनी अंदाज बांधला आहे. यामुळे भारतीय मान्सूनवर याचा विपरीत परिणाम होईल आणि सरासरी पेक्षा कमी पाऊस राहील अशा चर्चा सध्या रंगत आहेत.

अशातच डख यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. खरं पाहता डख यांनी नेमका दुष्काळ कधी पडतो याबाबत सविस्तर अशी माहिती शेतकऱ्यांसाठी जारी केली आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार जर 11 जूनला आकाशात दुपारी ठीक बारा वाजता सूर्याभोवती गोल रिंगण दिसलं तर त्यावर्षी हमखास दुष्काळ पडत असतो. अशा वर्षी पाऊस खूपच कमी प्रमाणात येतो. अशा वर्षी कोरडा दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु 2019 नंतर अशी परिस्थिती तयार झाली नसल्याचे मत पंजाब रावांनी व्यक्त केल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 2019 नंतर एकदाही दुष्काळ नसण्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय त्यांनी 15 मे ते 30 मे दरम्यान ज्या गावात किंवा परिसरात पाऊस पडतो अगदी दोन-तीन थेंब जरी पाऊस पडला तरी देखील अशा गावात तसेच परिसरात त्याच्या पुढल्या वर्षीच्या पावसाळ्यात जास्त पाऊस हा पडत असतो. मात्र जर 15 मे ते 30 मे दरम्यान एखाद्या गावात किंवा परिसरात पाऊस पडला नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी अशा परिसरात मात्र मान्सून हा एक महिना उशिरा दाखल होतो. एक महिना उशिराने पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबतात. यामुळे पीक उत्पादनात घट होण्याचा धोका असतो.
मान्सून 2023 बाबत वर्तवला हा मोठा अंदाज
पंजाबरावांनी मान्सून 2023 बाबत देखील माहिती दिली आहे. पंजाबरांच्या मते यंदा एल निनो चा धोका राहणार नाही. मान्सून हा त्याच्या ठरलेल्या वेळेतच यावर्षीही दाखल होणार आहे. साधारणपणे सात जूनच्या आसपास महाराष्ट्रात पावसाची हजेरी राहणार आहे. तरी 7 जूनला पाऊस कोसळला नाही तरीदेखील 20 ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रात हमखास पाऊस पडेल. गेल्या हंगामासारखाच याही हंगामात चांगला पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाब रावांनी दिली आहे.