Motilal Oswal Stock : सध्या शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण सुरू आहे आणि यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. शेअर मार्केट मधील पडझड गुंतवणूकदारांची झोप उडवणारी आहे. दरम्यान शेअर मार्केट मधील कमकुवत सेंटीमेंट असतानाही टॉप ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने असे काही स्टॉक सुचवले आहेत जे की गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये श्रीमंत बनवू शकतात.
जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी मोतीलाल ओसवालने 5 मजबूत फंडामेंटल असणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक सुचवले आहेत. अशा स्थितीत आता आपण मोतीलाल ओसवालने सुचवलेल्या या स्टॉक बाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

मोतीलाल ओसवालने सुचवलेले स्टॉक
विशाल मेगा मार्ट : तुम्हाला जर शेअर मार्केट मधील या कमकुवत सेंटीमेंटच्या काळात गुंतवणूक करायची असेल तर विशाल मेगा मार्टचा स्टॉक तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. मोतीलाल ओसवाल ने या स्टॉक साठी 165 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे. सध्या हा स्टॉक 134 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. म्हणजे या स्टॉकच्या किमतीत 22% हुन अधिक वाढ होईल असा अंदाज ब्रोकरेजने वर्तवला आहे.
ICICI Bank : सध्या हा स्टॉक 1480 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. मात्र या स्टॉक साठी मोतीलाल ओसवाल ने 1650 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. म्हणजे या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना आगामी काळात 11 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात.
Time Technoplast : ही एक प्लास्टिक प्रोडक्स बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचे स्टॉक सध्या 440 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहेत. मात्र मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेजने या स्टॉक साठी 578 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. म्हणजे या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 31 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे.
LT Foods : ही एक स्मॉलकॅप एग्रीकल्चर प्रॉडक्ट्स कंपनी आहे. सध्या कंपनीचे स्टॉक 484 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहेत. ब्रोकरेजने या स्टॉक साठी 600 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. म्हणजे या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 24 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात.
Kaynes Tech : मोतीलाल ओसवालने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे. सध्या स्टॉक 5451 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. मात्र यासाठी ब्रोकरेजने 7300 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. म्हणजे याच्या किमतीत 34-35 टक्क्यांपर्यंतची वाढ होऊ शकते.