एमपीएससी ग्रुप बी – ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर ! ‘या’ दिवशी होणार परीक्षा, पहा परीक्षा केंद्रांची यादी

Published on -

Mpsc Group B & Group C Prelims Exam Date : एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एमपीएससी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी ग्रुप बी व ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे.

या सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख आता जाहीर झाली आहे. एमपीएससी ग्रुप बी व ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षाची तारीख नुकतीच आयोगामार्फत जाहीर करण्यात आली आहे. ही पूर्व परीक्षा 2023 येत्या रविवारी अर्थातच 30 एप्रिल 2023 रोजी नंदुरबार येथे होणार आहे.

हे पण वाचा :- अंबानी है तो मुमकिन है ! रिलायन्सच्या शेअर्समध्ये होणार ‘इतकी’ विक्रमी वाढ, गुंतवणूकदार बनणार मालामाल, कोण म्हणतय असं? पहा….

नंदुरबार येथील 14 उपकेंद्रांवर ही पूर्वपरीक्षा आयोजित केली आहे. यामुळे या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे. तसेच या परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी आतापासूनच पूर्वतयारी करून ठेवण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पूर्व परीक्षेच्या सेंटर पासून 200 मीटर अंतरावर प्रवेश बंदी केली आहे. जेणेकरून परीक्षा केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून ही सावधगिरी बाळगली जात आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो धोका वाढला ! ‘हे’ तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस अन गारपीट होणार; पंजाब डख यांचा अंदाज

खरं पाहता एमपीएससीच्या ग्रुप डी आणि ग्रुप डी साठी राज्यभरातून लाखो उमेदवार तयारी करत असतात. दरम्यान या लाखो उमेदवारांकडून ग्रुप बी आणि ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. दरम्यान आता आयोगाने या पूर्व परीक्षेची तारीख डिक्लेअर केली असल्याने या लाखो उमेदवारांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान आता आपण नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 14 उपकेंद्रांची माहिती जाणून घेणार आहोत.

  • श्रीमती एच. जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज
  • जी. टी. पाटील महाविद्यालय
  • श्रीमती. डी. आर. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज
  • कमला नेहरु कन्या विद्यालय
  • एकलव्य विद्यालय
  • ज. ग. नटावदकर ज्युनियर कॉलेज
  • एस. एस. मिशन मराठी उच्च माध्यमिक विद्यालय
  • एस.एस.मिशन, इंग्रजी उच्च माध्यमिक विद्यालय
  • पी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
  • ॲग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज
  • यशवंत विद्यालय व ज्युनियर कॉलेज
  • डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल

हे पण वाचा :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाचे ‘हे’ बियाणे खरेदी करू नका, नाहीतर…; कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe