Multibagger Stock : शेअर मार्केट हे असं मार्केट आहे जेथे दिवसाला करोडपती बनतात. मात्र यासाठी शेअर मार्केटचे एनालिसिस, स्टॉक चे एनालिसिस, बाजाराचा सखोल अभ्यास, तज्ञ लोकांचा सल्ला या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात.
अन्यथा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे अनेकांना शेअर मार्केट मधून फार नुकसान देखील सहन करावे लागले आहे. जे व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यांना नेहमीच लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
निश्चितच लॉंग टर्म मध्ये म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूक गुंतवणूकदारांच्या हिताची आहे. पण असेही अनेक स्टॉक असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यातच मालामाल बनवतात. आज आपण अशाच एका स्टॉक संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मात्र तीन वर्षात तब्बल 3050 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
म्हणजे या स्टॉक मध्ये जर तीन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्या गुंतवणूकदाराला तब्बल 31 लाख रुपयांचा परतावा मिळाला असेल. निश्चितच, आता तुम्हाला या स्टॉक संदर्भात सर्व माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. चला तर मग वेळ न दवडता तुमच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करूया.
कोणता आहे तो स्टॉक
हा स्टॉक आहे फोकस लाईटिंग आणि फिक्चर लिमिटेडचा. हा शेअर गेल्या तीन वर्षांच्या काळात 17 रुपयांवरून 548.55 वर पोहोचला आहे. म्हणजे हा शेअर या काळात तीन हजार पन्नास टक्क्यांनी वाढला आहे. परंतु गुरुवारी या स्टॉक मध्ये घसरण देखील झाली आहे. जवळपास 4.97% ची घसरण गुरुवारी नमूद करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा सविस्तर
1 लाखाचे बनलेत 31 लाख
मे 2020 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर हा स्टॉक 17 रुपये आणि 40 पैशांवर ट्रेड करत होता. आणि मे 2023 मध्ये हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 548 रुपये आणि 55 पैशांवर ट्रेड करत होता.
याचाच अर्थ जर एखाद्या गुंतवणूकदाराने मे 2020 मध्ये या स्टॉकवर विश्वास दाखवून एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आत्तापर्यंत ही गुंतवणूक जर होल्ड करून ठेवली असती तर अशा गुंतवणूकदाराची गुंतवणूक तब्बल 31 लाख 35 हजारापर्यंत पोहचली असती.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये विश्वास दाखवला असेल तर निश्चितच त्या गुंतवणूकदाराला आजच्या घडीला लाखो रुपयांचा परतावा या स्टॉक मधून मिळाला असेल.
मित्रांनो, येथे दिलेली माहिती ही केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. हा कोणत्याही परिस्थितीत गुंतवणुकीचा सल्ला नाही याची नोंद घ्या. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. शेअर मार्केट हे जोखीमिने परिपूर्ण आहे यामुळे येथे गुंतवणूक करताना सर्वप्रथम वित्तीय सल्लागाराचा सल्ला तुमच्यासाठी आवश्यक आहे.
हे पण वाचा :- आठवी पास तरुणांसाठी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्टात ‘या’ पदासाठी निघाली भरती, मिळणार ‘इतकं’ वेतन, पहा डिटेल्स