Mumbai Goa Expressway : मुंबई-गोवा महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आलं आहे. वास्तविक मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले अनेक वर्षांपासून रखले आहे. या महामार्गाच्या कामाबाबत तारीख पे तारीख शासनाकडून जाहीर केले जात आहे. यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात शासनाविरोधात रोष वाढत आहे.
विशेष म्हणजे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण हे देखील गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढले आहे. अशा परिस्थितीत या मार्गाचे काम लवकरात लवकर होणे अपरिहार्य आहे. दरम्यान आता राज्य शासनाने मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी आणखी एक वर्ष वाट पहावे लागणार असल्याचे सांगितले आहे.
खरं पाहता उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील गेल्या सुनावनीत शासनाने डिसेंबर 2023 पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होईल असं प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. दरम्यान आता काल झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत या मार्गाचे आता काम होईल अशी ग्वाही राज्य शासनाने न्यायालयात दिली आहे.
खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य शासन वारंवार या महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेची तारीख बदलत आहे. यामुळे नेमका हा महामार्ग कधी होणार हा प्रश्न मुंबई गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या सुनावणीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य शासनाने मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली आहे. या मार्गाचे बहुतेक काम हे पूर्ण झाले असून अरवली कांटे वाकड या मार्गातील साडेनऊ किलोमीटर लांबीचे काम बाकी असल्याचे न्यायालयात माहिती देण्यात आली आहे.
फेब्रुवारी 2024 अखेर यादेखील टप्प्याचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही देखील यावेळी शासनाच्या वतीने सरकारी वकील पीए काकडे यांनी न्यायालयात दिली. प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूर वाला व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. दरम्यान याआधी झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने पनवेल ते इंदापूर हा पट्टा सोडून उर्वरितपट्ट्यातील महामार्ग रुंदीकरणाचे काम डिसेंबर 2023 अखेर पूर्ण होईल असं सांगितलं होतं.
विशेष म्हणजे गेल्या सुनावणीत याबाबत प्रतिज्ञापत्र देखील राज्य शासनाकडून न्यायालयात दाखल झालं होतं. निश्चितच आता राज्य शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फेब्रुवारी 2024 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण करणार असल्याचा दावा केला असल्याने हा महामार्ग फेब्रुवारी 2024 अखेर खरंच पूर्ण होतो का हे पाहण्यासारखं राहणार आहे.