Mumbai Goa Expressway : ब्रेकिंग ! मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करा ; न्यायालयाचे आदेश

Published on -

Mumbai Goa Expressway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले होते. मात्र आता या महामार्गाच्या कामाला मोठी गती लाभत आहे.

यामुळे निश्चितच मुंबई गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक आनंदाची अशी बातमी आहे.या महामार्गाचे काम डिसेंबर 2023 अखेर करण्याचे न्यायालयाने आदेशित केले असल्याने या महामार्गाच्या कामाला गती लाभली असल्याचे सांगितले जात आहे.

हा महामार्ग परशुराम घाटातून जात असून या ठिकाणी मशीनच्या साह्याने सध्या महामार्गाचे काम केले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जवळपास 70 टक्के एवढं काम या रस्त्याचे पूर्ण झाले असून उड्डाणपूल आणि घाटमाथ्यावरील काम बाकी असून या कामाला उशीर होण्याची शक्यता आहे.

परंतु न्यायालयाने डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेश निर्गमित केले असल्याने हे काम लवकरात लवकर कशा पद्धतीने केले जाऊ शकते यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे.

यामुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महामार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे परशुराम घाटात संरक्षण भिंती महामार्गासाठी उभारल्या जाणार आहेत. खरं पाहता परशुराम घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना या होत असतात.

यामुळे या घटनेमूळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच यामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुखापत होऊ नये यासाठी या संरक्षण भिंतीचे काम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे या परशुराम घाटात जवळपास दीड किलोमीटर लांबीची ही संरक्षण भिंत राहणार आहे. एकंदरीत न्यायालयाच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न निकाली निघणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe