गणपती बाप्पा पावला…! मुंबई-गोवा महामार्गाचे ‘हे’ महत्त्वाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार, नितीन गडकरींनी दिलेत आदेश

Published on -

Mumbai Goa Expressway : मुंबई-गोवा महामार्गाबाबत एक मोठं अपडेट हाती येत आहे. खरं पाहता, येत्या काही दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचे पर्व सुरु होणार आहे. गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये स्थायिक झालेले कोकणातील चाकरमाने गावाकडे जातील.

दरम्यान, या कोकणातील प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.ती म्हणजे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

या महामार्गाच्या एकेरी लेनचे काँक्रिटीकरण गणपती बसण्यापूर्वी पूर्ण करा अशी सूचना गडकरी यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत दिली आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्याच्या ‘या’ महापालिकेत निघाली मोठी भरती, थेट मुलाखतीने होणार उमेदवाराची निवड, पहा….

आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल 9 मे 2023 ला म्हणजे मंगळवारी गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक घेतली होती.

या बैठकीत गडकरी यांनी ही सूचना दिली आहे. यावेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुरवातीचा पनवेल-इंदापूर हा 42 किलोमीटरचा सिंगल लेन काँक्रिट रस्ता पावसाळ्यापुर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे.

म्हणजेच मुंबई गोवा महामार्गाचे सिंगल लेनचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल अशी आशा आता व्यक्त होत आहे. खरं पाहता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाबाबत एक मोठं अपडेट दिल होत.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्यातील जिल्हा परिषद नोकरभरती साठी परीक्षेचे स्वरूप झाले जाहीर; किती प्रश्न राहतील, गुण किती, कशी राहणार प्रश्नपत्रिका? पहा…

गडकरी यांनी त्यावेळी मुंबई गोवा महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल याची थेट तारीख सांगितली होती. ते म्हटले होते की, गोवा महामार्गाचे संपूर्ण काम फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.

दरम्यान आता गडकरी यांनी या महामार्गाच्या सिंगल लेनचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी विशेष खास राहणार आहे.

म्हणून जर या महामार्गाचे काम गडकरी यांनी सांगितलेल्या वेळेत झाले तर गणपती बाप्पा यावर्षी खरंच चाकरमान्यांना पावला असं म्हणायला काही हरकत राहणार नाही असं बोललं जात आहे.

हे पण वाचा :- 8वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात निघाली भरती, पगार मिळणार 60 हजाराहून अधिक, पहा डिटेल्स

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe