Mumbai-Goa Expressway : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे या महामार्गाच्या कामाला अपेक्षित अशी गती लाभलेली नाही. दरम्यान आता या महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असून लवकरच हा महामार्ग सुरु करण्याचे नियोजन असून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाबाबत एक मोठी माहिती दिली आहे. गडकरी यांनी या मार्गाचे फोटो नुकतेच शेअर केले असून या मार्गाचे काम किती झाले आहे आणि उर्वरित काम केव्हा होईल याबाबत देखील संकेत दिले आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई गोवा महामार्गाची नुकतेच नितीन गडकरी यांनी पाहणी केली आहे. यावेळी उद्योग मंत्री उदयसामंत हे देखील गडकरी यांच्या समवेत होते. या मार्गाची गडकरी यांनी हवाई पाहणी केली असून पाहणी दौऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकही गडकरी यांची झाली आहे. या बैठकीत मंत्रिमहोदयांनी या मार्गाच्या कामाबाबत आढावा घेतला आहे. खरं पाहता या महामार्गाच भूसंपादन करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
यामुळे या मार्गाचे काम सुरुवातीला खूपच रखडले. अखेर आता यावर तोडगा काढण्यात आला असून या मार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या महामार्ग अंतर्गत इंदापूर ते झारप हे काम केलं जात आहे. विशेष म्हणजे हे काम १० पॅकेजेसमध्ये विभागण्यात आले आहे. यासाठी जवळपास १५ हजार ५६६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची ३५६ किमी इतकी लांबी असून यापैकी २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी या पाहणी दौऱ्यानंतर आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वर सार्वजनिक केली आहे.
यासोबतच त्यांनी या महामार्गाचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यापूर्वी देखील गडकरी यांनी वेगवेगळ्या महामार्गाच्या पाहणी नंतर त्या महामार्गाचे फोटो आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहेत. दरम्यान आता त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे फोटो शेअर केले असून उर्वरित काम जलद गतीने सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच या महामार्गाच्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आदेश देखील दिले आहेत.
यामुळे आता हे काम लवकरच मार्गी लागेल असा आशावाद पुन्हा एकदा व्यक्त होत आहे. काही मीडिया रिपोर्ट मध्ये या मार्गाचे काम यावर्षी अखेर होईल असा दावा केला जात आहे. अशातच आता या मार्गाची पाहणी गडकरी यांनी केली असल्याने नेमका हा रखडलेला मार्ग केव्हा पूर्ण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.