Mumbai Goa Expressway : मुंबई-गोवा होईल केव्हा ! मुंबई-गोवा महामार्गाला नेमका कशाचा अडसर ; का रखडलं महामार्गाच काम?

Published on -

Mumbai Goa Expressway : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि शेजारील राज्य गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी महामार्गाचे काम गेल्या एक दशकापासून सुरू आहे.

मुंबई गोवा दृतगती महामार्गाचे काम 2011 मध्ये सुरू करण्यात आल असून एक दशकाहून अधिक काळ झाला तरी अजूनही सदर महामार्गाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. तसेच महामार्गाच काम झाल आहे ते देखील दयनीय परिस्थितीत पोहोचले आहे. परिस्थितीत आज आपण या महामार्गाचे काम नेमके का रखडले आणि सध्या या महामार्गाची काय स्थिती आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

खरं पाहता मुंबई गोवा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 म्हणून ओळखला जातो. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. हा महामार्ग मुंबई आणि गोवा या दोन मोठ्या शहरांना जोडणारा आहे. या महामार्गामुळे पर्यटन क्षत्राला, कृषी क्षेत्राला तसेच उद्योग जगताला मोठा आधार मिळणार आहे.

यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होणार आहे. कोणत्याही राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्रांमधील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासात या महामार्गामुळे मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. हा सदर महामार्ग एकूण दोन टप्प्यात पूर्ण करण्याचे टार्गेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आखले आहे.

पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप अशा दोन टप्प्यात या महामार्गाचे काम कंप्लिट होणार आहे. मात्र हे तर झाले कागदी आराखड्याची बाब. प्रत्यक्षात या महामार्गाच्या या दोन्ही टप्प्यांच्या कामाबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

या प्रकल्पासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 2011 मध्ये पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले तर दुसऱ्या टप्प्यातील काम 2014 मध्ये काम सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील काम डांबरीकरणाचे होते तर दुसऱ्या टप्प्यातील काम काँक्रिटीकरणाचे. मात्र आता पहिल्या टप्प्यातील काम देखील काँक्रिटीकरणाचे केले जाणार आहे.

मुंबई गोवा महामार्ग काम रखडण्यामागील प्रमुख कारणे खालील प्रमाणे

खरं पाहता या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे. या महामार्गाच्या कामाला केव्हा गती मिळेल याबाबत अजूनही शँकाच आहे. जाणकार लोकांच्या मते सुरुवातीला या महामार्गाच्या कामात भूसंपादनामुळे उशीर झाला. पेन आणि माणगाव मध्ये या महामार्गासाठी भूसंपादन करणे हेतू शेतकऱ्यांचा विरोध होता.

जेमतेम शेतकऱ्यांचा विरोध मावळला त्यानंतर भूसंपादनाच्या मोबदल्याला उशीर झाला. याशिवाय सदर महामार्ग कर्नाळा अभयारण्यातून जाणार असल्याने पर्यावरणाची देखील हानी होणार म्हणून पर्यावरण विभागातील परवानगी घेण्यास उशीर झाला.

नंतर कंत्राटदार बदलला गेला, नवीन कंत्राटदाराची नियुक्ती झाली तर पहिला कंत्राटदार न्यायालयात गेला. या अशा एक ना अनेक कारणामुळे महामार्गाचे काम चांगलेच रखडले. परिणामी या महामार्गाच्या प्रकल्प खर्चात मोठी वाढ होत आहे.

महामार्गाची सद्यस्थिती तर जाणून घ्या

या महामार्गाचे काम एकूण दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या रूटचे काम केले जाणार आहे. यामध्ये पळस्पे ते वडखळ हे काम पूर्ण झाले आहे मात्र वडखळ ते इंदापूर काम बाकी आहे. एकंदरीत या महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा देखील प्रवाशांना सामना करावा लागत आहे.

कोलाड मध्ये महामार्गाचे काम बाकी आहे. इंदापूर आणि माणगाव या ठिकाणी बायपासची कामे देखील राहिली आहेत. कशेडी बोगद्याचे काम मात्र सुरू आहे. परशुराम घाटातील काम सुरू झाले आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास सर्वच कामे झाली आहेत. चिपळूण ते संगमेश्वर आणि लांजा ते ओणी या रूटचे कामे बाकी आहेत. एकंदरीत महामार्गाचे काम अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.

दरम्यान अलिबाग न्यायालयात या प्रकरणाबाबत सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने कोर्ट कमिशनर ची स्थापना करून महामार्गाबाबत सत्यता जाणून घेतली. या कमिशनरने न्यायालयात दिलेल्या अहवालामध्ये रस्त्याच्या कामाबाबत चांगलीच कानउघडणी केली आहे. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात देखील महामार्गाच्या कामाबाबत याचिका दाखल झाली असून यावर सूनवाई सुरू आहे.

दरम्यान या महामार्गाचे काम रखडण्यामागे लोकप्रतिनिधींच उदासीन धोरण देखील कारणीभूत ठरले आहे. निश्चितच या महामार्गासाठी एक ना अनेक अडथळे समोर आले आहेत. एकंदरीत 2011 मध्ये सुरू झालेले काम 2022 झाले तरीदेखील पूर्ण झालेले नाही.

यामुळे मुंबई गोवा होईल केव्हा हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. दरम्यान या महामार्गाच्या कामासाठी लवकरात लवकर भूसंपादनाची कामे पूर्ण केली गेली पाहिजेत आणि लोकप्रतिनिधींनी देखील या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत जाणकार लोकांकडून व्यक्त केले जात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe