खुशखबर ! ग्रँटरोड ते इर्स्टन फ्रीवे दरम्यान नवीन उन्नत मार्ग विकसित होणार, मात्र पाच मिनिटात ग्रँड रोड-इस्टर्न फ्रीवे दरम्यान प्रवास करता येणार, पहा रूटमॅप

Ajay Patil
Published:
mumbai news

Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळी रस्त्यांचे कामे हाती घेण्यात आले आहेत. केंद्र सरकार अन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच इतर प्राधिकरणाकडून रस्ते व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आता मुंबई महानगरपालिकेने देखील ग्रँड रोड ते ईस्टर्न फ्री वेदरम्यान प्रवास करण्यासाठी एक नवीन उन्नत मार्ग डेव्हलप करण्यासाठी कंबर कसली आहे.

सध्या स्थितीला ग्रँड रोड ते ईस्टर्न फ्री वेदरम्यान प्रवास करण्यासाठी 50 मिनिटांचा कालावधी लागतो मात्र बीएमसी ने असा एक मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याने हे अंतर मात्र पाच मिनिटात पार होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या या निर्णयामुळे दक्षिण मुंबईच्या उत्तर टोकाकडून इस्टर्न फ्रीवे दरम्यान असलेल्या कनेक्टिव्हिटी मध्ये सुधारणा होणार आहे.

त्यामुळे दोन्ही ठिकाणांचा प्रवास सोयीस्कर होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार असल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, हा नवा उन्नत मार्ग फ्रीवेच्या ऑरेंज गेटपासून सुरू होणार आहे. आणि जे. राठोड रोड – हँकॉक ब्रिज – जे. जे. उड्डाण पुलाच्यावरून मौलाना शौकत अली रोड – फेरेरे ब्रिजच्या पूर्वेला संपणार आहे.

निश्चितच हा उन्नत मार्ग प्रवाशांचा किमती वेळ वाचवण्यास कारगर सिद्ध होईल यात शँकाचं नाही. दरम्यान मुंबई महापालिका लवकरच या मार्गासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. विशेष बाब अशी की, न्हावाशेवा ते शिवडी ट्रान्सहार्बर हार्बर लिंकशी हा नवीन प्रस्तावित मार्ग कनेक्ट करण्याची योजना बीएमसीने आखली आहे.

त्यामुळे ग्रँटरोड, मलबार हील आणि ताडदेव परिसराला नवी मुंबई विमानतळाशी कनेक्ट करता येणार असल्याचे समजतं आहे. खरं पाहता शिवडी ते न्हावासेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक हा नवी मुंबई एअरपोर्ट आणि जेएनपीटीशी कनेक्ट केला जाणार असून यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

साहजिकच यामुळे फ्रीवेवरील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा 5.5 किमीचा उन्नत मार्ग हे ट्रॅफीक दूर करण्यासाठी मदत करणार असल्याचा दावा देखील केला जात आहे.

निश्चितच या साडेपाच किलोमीटरच्या उन्नत मार्गामुळे ग्रँड रोड ते इस्टर्न फ्री वेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा 50 मिनिटांचा कालावधी हा पाच मिनिटांवर येणार असल्याने कुठे ना कुठे प्रवाशांची मोठी सोय यामुळे होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe