मोठी बातमी ! आता मुंबई ते नवी मुंबईचं अंतर पाच मिनिटात पार होणार ; ईस्टर्न फ्री वे ते ग्रँटरोड या 5.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 2500 कोटींचा खर्च होणार, पहा रूटमॅप

Ajay Patil
Published:
mumbai news

Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या रस्त्यांची विकासाची कामे सुरू आहेत. यामध्ये राजधानी मुंबईत सर्वाधिक कामे केली जात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या सागरी मार्ग, भुयारी मार्ग, टनेल इत्यादीची कामे जोमात सुरु आहेत. खरं पाहता राजधानी मुंबईमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्येचा आलेख हा वाढत आहे.

लोकसंख्या वाढत आहे म्हटल्यावर वाहनांची संख्या ही वाढणारच. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील वाढणारच. अशा परिस्थितीत मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, बीएमसी यांच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. यातच आता बृहन्मुंबई महानगरपालिकाने मुंबई ते नवी मुंबई चा प्रवास सुखकर बनवण्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.

बीएमसी ने ईस्टर्न फ्री वे ते ग्रँड रोडदरम्यान एक एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. हा एलिव्हेटेड रस्ता साडेपाच किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी जवळपास 2500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.याबाबत एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईच्या पूर्व उपनगरांना चेंबूर, घाटकोपरला जोडण्यासाठी फ्रीवेचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

हा फ्रीवे दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेटपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या फ्रीवेमुळे ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना जलद रित्या पोहचण्यास मदत होत असून आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक देखील शिवडी या ठिकाणी सध्या स्थितीला असलेल्या फ्रीवेला जोडला जाणार आहे. आता याचा परिणाम म्हणून दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी गाठणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रँड रोड इस्टर्न ईस्टर्न फ्री वे दरम्यान सध्या प्रवासासाठी लागतात 35 मिनिटं

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ग्रँट रोड ते इस्टर्न फ्री वे दरम्यान साडेपाच किलोमीटरचे अंतर आहे. मात्र हा मार्ग वर्दळीचा असल्याने या दोन्ही ठिकाणादरम्यान प्रवास करण्यासाठी सध्या स्थितीला 35 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र बीएमसी एलिव्हेटेड रस्ता बांधणार असल्याने हा रस्ता पूर्णपणे तयार झाल्यानंतर हे अंतर मात्र पाच ते सात मिनिटात पार होणार आहे. हा एलिव्हेटेड रस्ता तयार झाला तर ग्रँट रोड, नाना चौक, नॅपन्सी रोड, तारदेव, मुंबई सेंट्रल परिसरही थेट एमएमआरशी जोडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर शिवडी-वरळी लिंक रोड आणि ऑरेंज गेट ते कोस्टल रोडमुळे मुंबईतील दक्षिण भागाला तीन वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी देखील यामुळे मिळणार आहेत. निश्चितच या एलिवेटेड रस्त्यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे नवी मुंबई ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बहुमूल्य असा वेळ वाचेल. सध्या जे काही छोटे मोठे अपघात होतात ते देखील यामुळे कमी होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एलिवेटेड रस्त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

असा असेल हा रूट?

एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार ईस्टर्न फ्रीवे ते ग्रँड रोड दरम्यान एलिव्हेटेड रस्ता उभारला जाणार आहे. हा रस्ता ऑरेंज गेट म्हणजेच ईस्टर्न फ्रीवेपासून स्टार्ट होईल आणि मग जे. राठोड मार्गला जोडेल तेथून मग हँकॉक ब्रिज – रामचंद्र भट्ट मार्ग जो जे.जे. फ्लायओव्हरच्या वर आहे तेथून – एम.एस. अली रोड आणि शेवटी फ्रेरे ब्रिज पूर्व आणि पठ्ठे बापूराव मार्ग देना टॉकीज मार्ग म्हणजे ग्रँट रोडपर्यंत जाणार आहे.

कसा उभारला जाणार हा एलिव्हेटेड रस्ता 

हा एलिव्हेटेड रस्ता दोन पदरी किंवा तीन पदरी राहू शकतो. याची लांबी 5.5 किलोमीटर राहणार आहे. तसेच 5.5 मीटर ते 10.5 मीटर पर्यंत या मार्गाची रुंदी राहू शकते असा देखील अंदाज बांधला जात आहे. याशिवाय या होऊ घातलेल्या रस्त्याबाबत अधिक माहिती अशी की, हा एलिवेटेड रस्ता बनवताना आरसीसी पाइल, पाइल कॅप, पीअर, पीअर कॅप तयार करताना विशेष प्रकारचे स्टील वापरण्यात येऊ शकत. भविष्यात याला गंज लागू नये म्हणून स्टील प्लेट गर्डरचे बनलेले राहतील, अशीही माहिती समोर आली आहे. निश्चितच हा एलिव्हेटेड रस्ता वाहतूक कोंडी फोडण्यास सक्षम राहणार असून लॉंग लास्टिंग टिकेल. दरम्यान या रस्त्यासाठी 2,500 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe